Maratha Reservation:मराठा आरक्षणासाठीच्या नवीन जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळणार?

0
Maratha Reservation:मराठा आरक्षणासाठीच्या नवीन जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळणार?
Maratha Reservation:मराठा आरक्षणासाठीच्या नवीन जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळणार?

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईत (Mumbai) सुरु असलेले आंदोलन स्थगित झालं आहे. आरक्षणासंबंधी उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आलेल्या शिष्टमंडळानं आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यासंबंधित शासन अध्यादेश म्हणजेच जीआर दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण सोडलं आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत निघाललेला नवीन जीआर (New GR) नेमका काय आहे आणि या जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र कुणाला आणि कसं मिळणार ? सविस्तर पाहुयात… 

नक्की वाचा : साईनगर, निजामाबाद गाड्यांना थांबा; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

नवीन जीआरमध्ये नेमकं काय ?(Maratha Reservation)

मराठा आरक्षणासाठी निघालेल्या नवीन जीआरनुसार, हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी,मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी गावपातळीवर एक समिती गठीत करण्यात येईल. या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहायक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल.

अवश्य वाचा : कर्जतच्या मराठा बांधवांचा मुंबई-पुणे महामार्गावर जल्लोष

कोणाला मिळणार आरक्षण (Maratha Reservation)

मराठा समाजातील भुधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दि. १३.१०.१९६७ पूर्वी  किंवा त्यांचे पूर्वज हे संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे.या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या पुराव्यांची स्थानिक चौकशी करून खातरजमा केली जाईल. संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील,कुळातील किंवा नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील किंवा कुळातील असल्यास कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.

हे प्रतिज्ञापत्र घेऊन गावपातळीवरील नेमलेली स्थानिक समिती, वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदाराला कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील, असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, हा निर्णय देण्यात आला असून सामाजिक न्याय विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख यांच्या सहीने हा आदेश प्राप्त झाला आहे.