Maratha society : ‘भाकप’ व सकल मराठा समाजाने पुकारलेला शेवगाव बंद यशस्वी

Maratha society : 'भाकप' व सकल मराठा समाजाने पुकारलेला शेवगाव बंद यशस्वी

0
Maratha society

Maratha society : शेवगाव : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (Communist Party of India) व सकल मराठा समाज (Maratha society) शेवगाव तालुका यांनी पुकारलेला शेवगाव बंद १०० टक्के यशस्वी झाला. कर्मचाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व शेवगाव तालुक्यातील सकल मराठा समाज्याच्या वतीने अंतरवाली सराटी येथे प्राणांतिक उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाज्याच्या वतीने शेवगाव बंदची हाक देण्यात आली होती.

हे देखील वाचा: जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही’- एकनाथ शिंदे

भारत बंदला शेवगाव येथे चांगला प्रतिसाद (Maratha society)


स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करा, शेती मालाच्या हमीभावाचा कायदा करावा, चार कामगार संहिता रद्द करुन पुर्वीचे लढून मिळवलेले कामगार कायदे कायम ठेवा, महागाई कमी करा, बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय निमशासकीय पदे तत्काळ भरावीत, केंद्र सरकारने दिल्ली येथील शेतकरी आंदोलनावेळी दिलेली आश्वासने पूर्ण करा, आशा व गट प्रवर्तक यांच्या मान्य केलेल्या मागण्यांचा ताबडतोब जीआर काढावा आदी मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शेवगाव येथे चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण शहरात बंद पाळण्यात आला. शेतकरी व कामगारांनी मोर्चा काढून आपल्या मागण्या व केंद्र व राज्य सरकार विरूद्ध घोषणाबाजी करत या बंदमध्ये सहभाग घेतला.

नक्की वाचा: मराठा आरक्षणावर २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन; मुख्यमंत्री शिंदेंनी मांडली भूमिका

आंदोलनात सहभाग (Maratha society)


यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, राज्य कौन्सिल सदस्य कॉ. संजय नांगरे, गोरक्षनाथ काकडे, वैभव शिंदे, आशा कर्मचारी सुवर्णा देशमुख, सुरेखा चव्हाण ,गीता थोरवे ,शितल थोरवे यांची भाषणे झाली. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड. अविनाश मगरे, एकनाथ कुसळकर यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. भगवानराव गायकवाड, बबनराव पवार, संदिप इथापे, राम लांडे, वैभव शिंदे, अशोक नजन, सय्यद बाबुलाल, एजाज काझी, संजय बडधे, गीता थोरवे,अंजली भुजबळ, सुनेञा महाजन आदी प्रमुख उपस्थित होते. भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आयटक, आशा व गट प्रवर्तक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, लाल बावटा रिक्षा युनियन, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते व नेते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here