Maratha society : मराठा समाजाने उपसले ‘ब्रह्मास्र’; अहमदनगर लाेकसभेसाठी ६०० उमेदवार उतरणार मैदानात; जरांगेंनी केली भूमिका स्पष्ट

Maratha society : मराठा समाजाने उपसले 'ब्रह्मास्र'; अहमदनगर लाेकसभेसाठी ६०० उमेदवार उतरणार मैदानात; जरांगेंनी केली भूमिका स्पष्ट

0

Maratha society : नगर : लाेकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जाेरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजपने नुकतीच महाराष्ट्रातील २० जणांची यादी जाहीर केली आहे. खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांना अहमदनगर लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसरीकडे मराठा समाजही (Maratha society) मराठा आरक्षणासाठी भलताच आक्रमक झाला आहे. अहमदनगर लाेकसभेसाठी ६०० मराठे निवडणुकीत उतवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनासमाेर माेठी डाेकेदुखी वाढणार आहे.

हे देखील वाचा : निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये ;अजित पवारांचा इशारा

मराठा समाजाने सुरू केली तयारी

सकल मराठा समाजातर्फे अहमदनगर लोकसभा मतदार संघात लोकसभेसाठी सहाशे ते सातशे मराठा उमेदवार अर्ज दाखल करणार आहे, अशी स्पष्ट भूमिका मराठा समन्वयक राम जरांगे यांनी स्पष्ट केली आहे. त्या संदर्भात मराठा समाजाने तयारी सुरू केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

नक्की वाचा : भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटलांना उमेदवारी

जामखेड मधून सर्वाधिक १०४ जणांनी लोकसभा लढण्याची तयारी (Maratha society)

सर्वाधिक जामखेड येथे १०४ जणांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. तर श्रीगोंदे ३८, कर्जत १२, नगर तालुका ५४, नगर शहर ५५, पाथर्डी ४८, पारनेर २९ जणांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे स्वतः डिपॉझिट भरून हे उमेदवार उभे राहणार असल्याचे राम जरांगे यांनी सांगितलं आहे. तसेच, प्रत्येक गावातून जास्तीत जास्त ४ तर कमीत कमी २ मराठा उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रशासनासमोर निवडणुकीचे माेठे आव्हान उभे राहणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here