Maratha society : कोपरगावातील मराठा समाज बांधवांकडून निषेध व्यक्त

Maratha society : कोपरगावातील मराठा समाज बांधवांकडून निषेध व्यक्त

0
Maratha society

Maratha society : कोपरगाव : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवण येथील राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा उभारण्यात आलेला पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोपरगाव शहरातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या गेटसमोर बसून सकल मराठा समाजातर्फे (Maratha society) तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मराठा समाज बांधवांनी विविध फलक हाती घेत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला.

नक्की वाचा: बनावट सोन्याचे बिस्कीट देत फसवणूक करणारा गजाआड

कठोर कारवाईची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणारे शिल्पकार, इंजिनिअर, परवानगी देणारे सर्व अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारकडे करण्यात आली आहे. सदरचे निवेदन तहसीलदार महेश सावंत यांना देण्यात आले आहे.

अवश्य वाचा: दीपक केसरकरांच्या वक्तव्यावरून संजय राऊत भडकले; म्हणाले …

मराठा सेवकांच्या वतीने सदर घटनेचा निषेध (Maratha society)

दरम्यान चासनळी येथे ग्रामस्थ व मराठा सेवकांच्या वतीने सदर घटनेचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी विनय भगत, सुनिल साळुंखे, योगेश खालकर, विकास आढाव, विजय जाधव, अशोक आव्हाटे, अमित आढाव, नवनाथ देवकर, बाळासाहेब देवकर, शशिकांत देवकर, संदिप डुंबरे, लक्ष्मण सताळे, दीपक लोखंडे आदिंसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.