Marathi : मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी बोलीतील शब्द वैभवाचे संवर्धन गरजेचे – डॉ. सूर्यकांत वरकड

Marathi : मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी बोलीतील शब्द वैभवाचे संवर्धन गरजेचे - डॉ. सूर्यकांत वरकड

0
Marathi : मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी बोलीतील शब्द वैभवाचे संवर्धन गरजेचे - डॉ. सूर्यकांत वरकड
Marathi : मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी बोलीतील शब्द वैभवाचे संवर्धन गरजेचे - डॉ. सूर्यकांत वरकड

Marathi : अहिल्यानगर : रयत शिक्षण संस्थेचे (Rayat Shikshan Sanstha) राधाबाई काळे महिला महाविद्यालयात मराठी (Marathi) विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ . सूर्यकांत वरकड यांनी ‘कविता : माय माती ‘ या विषयावर त्यांनी स्वरचित व काही मराठीतील प्रख्यात कवींच्या कविता सादर केल्या. माय माती, माय माउली व मायबोली यांचा समन्वय त्यांनी आपल्या काव्यातून साधून मानवी नातेसंबंधातील गोडवा जपण्याचा संदेश त्यांनी मुलींना दिला. भाषा समृद्धीसाठी ग्रामीण भाषेतील विविध दाखले देऊन भाषा जतन करण्याबाबत मार्गदर्शन केले.

नक्की वाचा : स्वारगेट अत्याचार प्रकरण;आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या गणवेशातील फोटो आला समोर

‘अक्षर’ या हस्तलिखित नियतकालिकाचे डिजिटल प्रकाशन

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर थोपटे यांनी शुभेच्छा दिल्या. इतिहास विभाग प्रमुख डॉ. गणेश विधाटे अध्यक्षस्थानी होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शुभांगी ठुबे, दै. सार्वमतचे उपसंपादक सचिन दसपुते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी मराठी विभागाच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ‘अक्षर’ या हस्तलिखित नियतकालिकाचे डिजिटल प्रकाशन मान्यवरांनी केले. तसेच मराठी भाषा पंधरवड्या निमित्त झालेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अवश्य वाचा : भारत-न्युझीलँड यांच्यात होणार अंतिम सामना; दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

मराठी भाषेच्या साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा आढावा (Marathi)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ. सचिन कोतकर यांनी करून दिला. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून अभिजात मराठी भाषेच्या साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा आढावा घेतला. कार्यक्रमाला प्रा.मयुरी बारवकर ,प्रा. स्नेहा पाटील, प्रा.हर्षिता झालानी, प्रा.रंजना सोनवणे उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गीतांजली खाडे यांनी केले.पारितोषिक वितरणाचे वाचन व आभार प्रदर्शन डॉ. शुभांगी दांगट यांनी केले.