Vijay Kadam Passed Away:मराठी सिनेसृष्टीवर शोककळा;ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन 

हरहुन्नरी कलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज पहाटे मुंबईत निधन झालं आहे.

0
Vijay Kadam
Vijay Kadam

Vijay kadam : मराठी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हरहुन्नरी कलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते विजय कदम (Vijay Kadam Passed Away) यांचे आज पहाटे मुंबईत (Mumbai) निधन झालं आहे. विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी (Cancer) झुंज देत होते. त्यावर मात देखील केली होती. मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला, त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईतील अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु,आज सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

नक्की वाचा : शौर्य आणि संघर्षाची गाथा सांगणारा‘फौजी’चित्रपट;’या’दिवशी होणार प्रदर्शित

अभिनेते विजय कदम यांच्यावर अंधेरीत अंत्यसंस्कार (Vijay Kadam Passed Away) 

अभिनेते विजय कदम यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीने एक मोठी हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सिनेसृष्टीच्या कलाकारांनी व्यक्त केली आहे. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंधेरी – ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम ६७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे.

अवश्य वाचा : ‘मी गुलाबी स्वप्न दाखवत नाही,ते पूर्ण करण्याची धमक ठेवतो’-अजित पवार

विजय कदम यांची कारकीर्द (Vijay Kadam Passed Away) 

विजय कदम १९८० आणि ९० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ते ओळखले जात असत. त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे त्यांचं लोकनाट्य आणि ‘खुमखुमी’ हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर गाजले होते. या कार्यक्रमापासून त्यांची लोकप्रियता वाढत गेली. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांचे चष्मेबहाद्दर, पोलीसलाईन, हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघ राजा राणी हे चित्रपट खूप गाजले. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर त्यांचं जाणं सिनेसृष्टीसाठी मोठी हानी असल्याची भावना काही कलाकारांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here