Marathi Language : प्रत्येकाने व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा : अपर जिल्हाधिकारी कोळेकर

Marathi Language : प्रत्येकाने व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा : अपर जिल्हाधिकारी कोळेकर

0
Marathi Language : प्रत्येकाने व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा : अपर जिल्हाधिकारी कोळेकर
Marathi Language : प्रत्येकाने व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा : अपर जिल्हाधिकारी कोळेकर

Marathi Language : नगर : भाषा हे जरी ज्ञान मिळविण्याचे माध्यम असले, तरी त्या पुढेही जाऊन आपल्या मातृभाषेचा विकास आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. मराठी भाषा (Marathi Language) अधिक सोईस्कर असून व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर आणि तिचा अंगीकार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी (Additional Collector) बाळसाहेब कोळेकर (Balasaheb Kolekar) यांनी केले.

नक्की वाचा : अहिल्यानगरात सांस्कृतिक संकुल उभे रहावे यासाठी प्रयत्न करू : प्रा. राम शिंदे

‘मराठी भाषेचे सौंदर्य व लवचिकता’ या परिसंवादाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘मराठी भाषेचे सौंदर्य व लवचिकता’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य डॉ. संजय कळमकर, डॉ. कैलास दौंड, किशोर मरकड, प्रा. शशिकांत शिंदे, तहसीलदार शरद घोरपडे, उपशिक्षणाधिकारी शिवगुंडे उपस्थित होते.  

अवश्य वाचा : महाकुंभला जाण्यासाठी विमान तिकिटे स्वस्त होणार;उड्डाण मंत्रालयाचा निर्णय

कोळेकर म्हणाले, (Marathi Language)

मराठी भाषा ही भारतातील एक प्राचीन आणि समृद्ध भाषा असून, तिच्या सौंदर्य आणि लवचिकतेमुळे ती आजही लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वैविध्यपूर्ण बोली, साहित्यिक परंपरा, आणि तांत्रिक शब्दसंपदेमुळे मराठी भाषा कालसुसंगत राहिली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने प्रत्येकामध्ये एक नवी उर्जा निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. डॉ. कैलास दौंड म्हणाले, मराठी भाषेची साहित्यिक परंपरा संतांच्या अभंगांपासून आधुनिक साहित्यापर्यंत विस्तारलेला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या संतांनी समाजाला मार्गदर्शन करणारे विचार देताना मराठीला एक आध्यात्मिक ओळख दिली. डॉ. संजय कळमकर म्हणाले, मराठी भाषा जितकी सुंदर आहे तितकीच ती लवचिकही आहे. शब्दांमधूनच मराठी भाषेचे सौंदर्य अधिक खुलत जाते. इंग्रजी भाषेकडे जरी जागतिकीकरणाची भाषा म्हणून पाहिले जात असले, तरी मानवाचा विकास केवळ मातृभाषेमुळेच होतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आईची भाषा म्हणून मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.