Marathi Literature : युनुस सय्यद यांच्या ‘इनुची गोष्ट’ला राज्य शासनाचा सर्वोच्च वाङ्मय पुरस्कार जाहीर

Marathi Literature : युनुस सय्यद यांच्या 'इनुची गोष्ट'ला राज्य शासनाचा सर्वोच्च वाङ्मय पुरस्कार जाहीर

0
Marathi Literature : युनुस सय्यद यांच्या 'इनुची गोष्ट'ला राज्य शासनाचा सर्वोच्च वाङ्मय पुरस्कार जाहीर
Marathi Literature : युनुस सय्यद यांच्या 'इनुची गोष्ट'ला राज्य शासनाचा सर्वोच्च वाङ्मय पुरस्कार जाहीर

Marathi Literature : श्रीगोंदा : जिद्द, चिकाटी आणि शब्दांच्या सामर्थ्यावर मृत्यूलाही हुलकावणी देता येते, याचंच जिवंत उदाहरण म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ गावचा तरुण लेखक युनुस सय्यद. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येत, ‘ब्लड कॅन्सर (Blood cancer)‘सारख्या जीवघेण्या आजारावर मात करणाऱ्या युनुस सय्यद यांच्या ‘इनुची गोष्ट’ या आत्मचरित्राला महाराष्ट्र शासनाचा मानाचा ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२४ (Late Yashwantrao Chavan State Literary Award 2024)‘ (लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार) जाहीर झाला आहे. कमी वयात राज्य शासनाचा वाङ्मय विभागाचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे युनुस हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलेच तरुण लेखक ठरले आहेत. मराठी राजभाषा दिनाचे (Marathi Official Language Day) औचित्य साधून २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

नक्की वाचा : माळीवाडा बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर

स्वप्न पूर्ण करण्याच्या वयातच ‘ब्लड कॅन्सर’चे निदान

या सोहळ्यात राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते युनुस सय्यद यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. युनुस सय्यद यांचा प्रवास कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. कोथुळ सारख्या दुर्गम भागातून येऊन त्यांनी पुण्याच्या नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षणासाठी पाऊल ठेवले. मात्र, स्वप्न पूर्ण करण्याच्या वयातच त्यांना ‘ब्लड कॅन्सर’ असल्याचे निदान झाले. घरची परिस्थिती अठराविश्व दारिद्र्याची, पदरी शिक्षणाचे स्वप्न आणि समोर मृत्यूचे संकट अशा कात्रीत युनुस सापडले होते.

अवश्य वाचा : शिर्डीत मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप समारंभ उत्साहात

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये साहित्याप्रती नवी ओढ (Marathi Literature)

अशा वेळी खचून न जाता त्यांनी तब्बल तीन वर्षे कॅन्सरशी यशस्वी झुंज दिली. हॉस्पिटलमधील त्या वेदनादायी रात्री, केमोथेरपीचा त्रास आणि मनातील अस्वस्थता त्यांनी डायरीत उतरवण्यास सुरुवात केली. याच डायरीचे रूपांतर पुढे ‘इनुची गोष्ट… अजून मी जिवंत आहे’ या प्रेरणादायी आत्मचरित्रात झाले. ‘इनु’ हे लेखकाचे टोपणनाव आहे. हे पुस्तक केवळ स्वतःची व्यथा सांगणारे नाही, तर कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना संकटातून बाहेर काढणारी एक ‘लाईफ गाईड’ आहे. सर्वसामान्य रुग्णांना कॅन्सर ट्रीटमेंटची तांत्रिक माहिती सोप्या भाषेत कळावी आणि त्यांना मानसिक बळ मिळावे, हा या लेखनामागील मुख्य सामाजिक उद्देश आहे. युनुस सय्यद यांच्या या यशाने ग्रामीण भागातील तरुणांमध्ये साहित्याप्रती नवी ओढ निर्माण झाली आहे. या पुरस्कारानंतर त्यांची आणखी तीन पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत. साहित्यातील हा प्रवास अनेकांसाठी दीपस्तंभ ठरणारा आहे.