Marathi Movies : बॉलिवूडपेक्षा चांगले सिनेमे मराठी इंडस्ट्रीत बनतायत – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी

Marathi Movies : बॉलिवूडपेक्षा चांगले सिनेमे मराठी इंडस्ट्रीत बनतायत - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी

0
Marathi Movies : बॉलिवूडपेक्षा चांगले सिनेमे मराठी इंडस्ट्रीत बनतायत - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी
Marathi Movies : बॉलिवूडपेक्षा चांगले सिनेमे मराठी इंडस्ट्रीत बनतायत - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी

Marathi Movies : नगर : मराठी सिनेमाला (Marathi Movies) आता चांगले दिवस आले आहेत. कारण मराठीतील अनेक पथकथा व कलाकारांच्या कलेला प्रेक्षक (Audience) भरभरून प्रतिसाद देत आहेत. मराठी भाषेच्या (Marathi Language) वादावरून सुरु झालेल्या वादावर आता बॉलीवूड कलाकारही व्यक्त होताना दिसत आहेत. यापूर्वी परेश रावल (Paresh Rawal) यांनी मराठी कलाकारांची स्तुती केली होती. आता नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) यांनीही मराठी सिनेमांचे कौतुक करून मराठी सिनेमांना प्रोत्साहन दिले आहे.

नक्की वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप  

मराठी सिनेमांना, नाटकांना चांगले दिवस

मराठी इंडस्ट्रीत सध्या साकारात्मक बदल दिसून येत आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण बऱ्याच वेळा मराठी सिनेमांना शो मिळत नाहीत, मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालतही नाहीत. असं पूर्वी घडत होतं, पण आता मात्र मराठी सिनेमांना, नाटकांना चांगले दिवस आले आहेत. हे बॉक्स ऑफिसचे आकडे आणि नाट्यगृहांबाहेर झळकणारे हाऊसफुल्लचे बोर्ड सांगतायत. ‘एप्रिल मे 99’, ‘गुलकंद’, ‘जारण’, ‘आता थांबायचं नाय’ यांसारख्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. समीक्षकांनीही त्यांचं भरभरुन कौतुक केलं. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी मराठी रंगभूमीचं तोंडभरुन कौतुक केलेलं. त्यावेळी त्यांनी ‘देवबाभळी’ नाटकाचा आवर्जुन उल्लेख केलेला. अशातच आता बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीनंही मराठी सिनेमा आणि मराठी कलाकारांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

Marathi Movies : बॉलिवूडपेक्षा चांगले सिनेमे मराठी इंडस्ट्रीत बनतायत - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी
Marathi Movies : बॉलिवूडपेक्षा चांगले सिनेमे मराठी इंडस्ट्रीत बनतायत – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी

अवश्य वाचा : अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश  

एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दिकीनं सांगितले की, (Marathi Movies)

एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दिकीनं सांगितले की, “मराठीत नेहमीच चांगले सिनेमे बनत आले आहेत. मराठीतील बरेचसे कलाकार नाटकातून व रंगभूमीवरून आलेले असतात. त्यामुळे अभिनयाच्या तालमीत ते उत्तम प्रकारे तयार झालेले असतात. त्यामुळे त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये जिवंतपणा असतो. मी तर म्हणतो की, बॉलिवूडपेक्षा चांगले सिनेमे मराठी इंडस्ट्रीत बनतायत. ‘फँड्री’, ‘कोर्ट’ यांसारखे अनेक उत्तम चित्रपट मराठी सिनेसृष्टीत तयार झाले आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here