Devendra Fadnvis : मराठी माणूस हा कलहशील असल्याचे आठव्या शतकात लिहून ठेवलेले आहे. मराठी माणसाला कलह करायला आवडतो म्हणून आपण संमेलन आयोजित करण्याचे थांबणार नाही. अशा संमेलनातूनच चांगले काम करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते,असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnvis) यांनी केले. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत तिसरे विश्व मराठी संमेलन (World Marathi Conference) होत आहे.
या संमेलनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा संमेलनात गौरव करण्यात आला.
नक्की वाचा : अंकुश चौधरी प्रथमच झळकणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत!
‘साहित्य संमेलन असो,नाट्य संमेलन वाद होतोच (Devendra Fadnvis)
विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने उद्भवलेल्या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो, विश्व मराठी साहित्य संमेलन असो, तिथे वाद निर्माण झाला नाही तर ते संमेलन असूच शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपला स्थायी भाव आहे. कारण आपण संवेदनशील, भावनाप्रधान लोक आहोत, त्यामळे वाद-प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होत असते.”
अवश्य वाचा : ‘धनंजय मुंडे गुन्हेगार नाही,मी त्यांच्या पाठीशी’-नामदेव शास्त्री
उदय सामंत यांचे फडणवीसांनी मानले आभार (Devendra Fadnvis)
“वादाच्या पुढे जाऊन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विश्व मराठी संमेलन आयोजित करून दाखविले त्याबद्दल उदय सामंत यांचे फडणवीसांनी आभार व्यक्त केले. जगभरात असा एकही देश नाही, जिथे मराठी माणूस पोहोचलेला नाही. कोणत्याही देशात आम्ही दौऱ्यासाठी गेलो तरी तिथे स्वागतासाठी मराठी माणसे लांबून लांबून येतात. हे बघून अतिशय आनंद वाटतो. नुकतेच दावोसला गेलो असताना तिथे काही मराठी मंडळींनी माझे स्वागत केले. एका लहान मुलाने “लाभले आम्हास बोलतो मराठी”, हे गाणं सुंदर पद्धतीने सादर केले. त्यात त्याने मी पुन्हा येईन,असेही म्हटले”, अशी आठवण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.