Marathi Proficiency Examination : नगर : पाईपलाईन रस्ता येथील आशा एज्युकेशन फाउंडेशन (Asha Education Foundation) संचलित जय बजरंग प्राथमिक विद्यालय (Jai Bajrang Primary School) येथील प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा संवर्धन संचलित राज्यस्तरीय प्राविण्य परीक्षेत (Marathi Proficiency Examination) उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील तब्बल २५ विद्यार्थी राज्य, जिल्हा तसेच केंद्रीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत. विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थी
इयत्ता पहिली : श्रीनिधी गणेश आडसरे (राज्यात द्वितीय), कादंबरी योगेश अनारसे (राज्यात तृतीय)
इयत्ता दुसरी : इशान दीपक घुले (राज्यात द्वितीय)
इयत्ता सहावी : सिद्धेश अमोल क्षीरसागर (राज्यात द्वितीय)
जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थी
इयत्ता पहिली : अनिरुद्ध अक्षय परळकर (जिल्ह्यात प्रथम), नियती वैभव आहेर (जिल्ह्यात द्वितीय)
इयत्ता दुसरी : अंजली रवींद्र आव्हाड (जिल्ह्यात द्वितीय), स्वरा रवींद्र आव्हाड (जिल्ह्यात चतुर्थ)
इयत्ता सातवी : अभिषेक प्रभाशंकर कुशवाह (जिल्ह्यात प्रथम), पियुष बाळासाहेब उबाळे (जिल्ह्यात चतुर्थ)
केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत झळकलेले विद्यार्थी
इयत्ता पहिली : युग अनिल गुंजाळ (केंद्रात चतुर्थ), तानिया जितेंद्र विश्वकर्मा (केंद्रात पंचम), कृष्णप्रिया प्रवीण बरबडे (केंद्रात पंचम)
इयत्ता दुसरी : प्रथमेश अशोक वारे (केंद्रात पंचम)
इयत्ता तिसरी : दर्शन गणेश घुले (केंद्रात द्वितीय)
इयत्ता चौथी : प्रेरणा प्रवीण बरबडे (केंद्रात तृतीय),
इयत्ता पाचवी : श्रीलेखा गणेश आडसरे (केंद्रात द्वितीय), आयुष अमृत कुलकर्णी (केंद्रात तृतीय), आरोही शंकर ठोकळ (केंद्रात चतुर्थ), कृष्णा कैलास मेहेत्रे (केंद्रात चतुर्थ), शिवानी प्रवीण पवार (केंद्रात पंचम)
इयत्ता सहावी : आदेश अमोल क्षीरसागर (केंद्रात प्रथम), श्रद्धा तुकाराम भवार (केंद्रात द्वितीय), श्रीराज गणेश भोसले (केंद्रात तृतीय), साक्षी कृष्णा पवार (केंद्रात चतुर्थ)
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शिक्षक व पालकांचे विशेष कौतुक (Marathi Proficiency Examination)
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, सहसचिव उमेशजी गांधी, व्यवस्थापक आशुतोष घाणेकर, सहव्यवस्थापक अमोल तोडकर यांनी अभिनंदन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षक व पालकांचे विशेष कौतुक केले. सुरेखा दुधाडे, आशा घुले, कल्पना मिसाळ, छाया क्षीरसागर आणि राहुल मोरे यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट तयारी करून मार्गदर्शन केले.



