Marathon : ९ फेब्रुवारीला रंगणार ‘रनर्सचा महाकुंभ’

Marathon : ९ फेब्रुवारीला रंगणार 'रनर्सचा महाकुंभ'

0
Marathon : ९ फेब्रुवारीला रंगणार 'रनर्सचा महाकुंभ'
Marathon : ९ फेब्रुवारीला रंगणार 'रनर्सचा महाकुंभ'

Marathon : नगर : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील सर्वात मोठी मानाची हाफ मॅरेथॉन (Marathon) म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग मॅरेथॉन (Nagar Rising Marathon) यंदा रविवारी (ता. ९) आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉनचे आयोजन नगर रायझिंग फाउंडेशनने केले आहे. या स्पर्धेसाठी दोन हजारपेक्षा जास्त धावपटूंनी सहभाग नोंदविला आहे. यंदाचे हे नववे वर्ष आहे. टाईमपास फेम प्रथमेश परब (Prathamesh Parab) सह प्रसिद्ध मराठी अभिनेते व अभिनेत्री या स्पर्धेत आकर्षणाचा केंद्र ठरणार आहेत, अशी माहिती नगर रायझिंग फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी दिली.  

नक्की वाचा : अहिल्यानगर मधील तालमींचा इतिहास

पहाटे ५ वाजेपासूनच विविध फिटनेस कार्यक्रमांचे आयोजन

ही मॅरेथॉन २१ किलोमीटर, १० किलोमीटर व ४ किलोमीटर अशा तीन कॅटेगरीजमध्ये होईल. स्पर्धेची सुरुवात अहमदनगर क्लब, अहिल्यानगर जवळील हत्तीच्या पुतळ्यापासून होईल. २१ किलोमीटरची मॅरेथॉन रविवारी (ता. ९) सकाळी ५.४५ वाजता, १० किलोमीटरची सकाळी ६.३० वाजता तर ४ किलोमीटरची मॅरेथॉन ७.३० वाजता सुरू होईल. मॅरेथॉन निमित्त रविवारी (ता. ९) पहाटे ५ वाजेपासूनच विविध फिटनेस कार्यक्रमांचे अहमदनगर क्लब, अहिल्यानगर मध्ये आयोजन करण्यात आले आहे. 

अवश्य वाचा : …म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला’; शिवराज राक्षेचं वक्तव्य

अनेक मराठी अभिनेते व कलाकारांची उपस्थिती (Marathon)

शनिवारी (ता. ८) एक्स्पो मध्ये सहभागी होण्यासाठी सायंकाळी टाईमपास फेम प्रथमेश परब येत आहे. तसेच रविवारी (ता. ९) एक राधा एक मीरा या आगामी फिल्म मधील गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले आणि संदीप पाठक हे कलावंत उपस्थित राहणार आहेत. तसेच सोनी मराठीवरील बहुचर्चित असणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील पृथ्वीक प्रताप आणि दत्तू मोरे हे सध्या गाजणारे चेहरे मॅरेथॉनच्या उद्घाटनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकांची किट शनिवारी (ता. ८) दुपारी १ ते सायंकाळी ८ या वेळेत अहमदनगर क्लब येथे मिळणार आहे. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये नगर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक सहभागी होणार आहेत.  


शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व मॅक्सिमस स्पोर्टस ॲकॅडमी हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. तर आय लव्ह नगर, सुहाना मसाले, बिगॉस, सी.टी. पंडोल ॲण्ड सन्स व बी.यू. भंडारी हे सह प्रायोजक आहेत. इंदू पॅव्हेलियन, हेमराज, चंगेडिया आउटडोअर्स, एमएमए मॅट्रिक्स जिम, सिनेलाईफ मल्टिप्लेक्स, हेल्थलेजर डाग्नॉस्टिक्स, अहमदनगर रिहॅब सेंटर, हायपरीस, एसपीजे स्पोर्टस क्लब, रेडिओ सिटी, अहमदनगर क्लब यांचे सहकार्य मिळत आहे. हेल्दी अफेअर्स, जय जलाराम फुड्स, बोरोनील हे गुडी पार्टनर आहेत.