Marathon : खासदार मॅरेथॉनमध्ये दोन हजार धावपटूंचा सहभाग

Marathon : खासदार मॅरेथॉनमध्ये दोन हजार धावपटूंचा सहभाग

0
Marathon : खासदार मॅरेथॉनमध्ये दोन हजार धावपटूंचा सहभाग
Marathon : खासदार मॅरेथॉनमध्ये दोन हजार धावपटूंचा सहभाग

Marathon : नगर : शेतकरी हितासाठी, समर्थनासाठी आणि न्याय हक्कासाठी ‘रन फॉर फार्मर’ या टॅगलाईनने कल्याण रस्ता बाह्यवळण येथे खासदार मॅरेथॉन (Marathon) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे दोन हजार धावपटूंनी (Runners) सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि आरोग्याच्या अधिकारासाठी १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि २.५ किलोमीटर स्पर्धेमध्ये ज्येष्ठ नागरिक, पुरुष, महिला, युवक-युवती  सहभागी झाले होते. स्पर्धेतील महिला खुल्या गटातून ऊसतोड कामगाराची मुलगी सुरेखा माने ने प्रथम क्रमांक मिळविला.

Marathon : खासदार मॅरेथॉनमध्ये दोन हजार धावपटूंचा सहभाग
Marathon : खासदार मॅरेथॉनमध्ये दोन हजार धावपटूंचा सहभाग

नक्की वाचा : महिला ग्रामसभेत दारू दुकान गावाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय

निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण बाह्यवळण येथे काल (ता. ९) खासदार मॅरेथॉन स्पर्धा झाली. यावेळी खासदार निलेश लंके, माजी महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, माजी नगरसेवक योगीराज गाडे, बबलू रोहोकले, केशव बेरड, रेवजी नांगरे, बाळासाहेब खिलारी आदी उपस्थित होते.

Marathon : खासदार मॅरेथॉनमध्ये दोन हजार धावपटूंचा सहभाग
Marathon : खासदार मॅरेथॉनमध्ये दोन हजार धावपटूंचा सहभाग

अवश्य वाचा : शिव्या बंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच आरगडे यांचे उपोषण

खासदार निलेश लंके म्हणाले की, (Marathon)

 स्पर्धेमध्ये महिला खुले गटातून सुरेखा मातने या विद्यार्थिनी प्रथम क्रमांक मिळविला. ती ऊसतोड कामगाराची मुलगी आहे. तिची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून तिच्या पुढील शिक्षणाला आर्थिक मदत केली जाईल. लवकरच मुंबई येथे राज्यस्तरीय महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, खासदार मॅरेथॉन स्पर्धेतून एकतेचा संदेश देण्याचे काम झाले असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले.

Marathon : खासदार मॅरेथॉनमध्ये दोन हजार धावपटूंचा सहभाग
Marathon : खासदार मॅरेथॉनमध्ये दोन हजार धावपटूंचा सहभाग

स्पर्धेतील विजेते
पुरुष खुला गट 
प्रथम क्रमांक – चांगदेव लाटे 
द्वितीय क्रमांक – प्रेम काळे 

वरिष्ठ पुरुष गट 
प्रथम क्रमांक – सूर्यकांत पारधे 
द्वितीय क्रमांक – बाजीराव मोठे 
तृतीय क्रमांक – राजाराम लगड 

महिला खुला गट 
प्रथम क्रमांक – सुरेखा माने 
द्वितीय क्रमांक – सई चेमटे 
तृतीय क्रमांक – केतकी सांगळे 

वरिष्ठ महिला गट 
प्रथम क्रमांक – कविता खंडेलवाल 
द्वितीय क्रमांक – स्वप्नाली पारधे 
तृतीय क्रमांक – रूपाली खंडेलवाल