Marathwada Farmers Sucide:मराठवाड्यात तीन महिन्यात २६९ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

0
Marathwada Farmers Sucide:मराठवाड्यात तीन महिन्यात २६९ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
Marathwada Farmers Sucide:मराठवाड्यात तीन महिन्यात २६९ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

Marathwada Farmers Sucide : मराठवाड्यात (Marathwada) शेतकरी आत्महत्यांचे (Farmers Sucide) प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे.यावर्षीच्या उन्हाळ्यात म्हणजेच १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत या विभागात एकूण २६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यावरून दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मार्च महिन्यात सर्वाधिक १०६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

नक्की वाचा : पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश  

या आत्महत्यांमागे मुख्यत्वे करून कर्जबाजारीपणा, शेतीचा वाढता खर्च, शेतमालाला मिळणारा अल्पभाव, नापिकी, खाजगी सावकारांकडून घेतलेले कर्ज, तसेच अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

अवश्य वाचा : शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनकडून धर्मवीरगडातील हत्तीमोट बारवेची स्वच्छता  

तीन महिन्यात २६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Marathwada Farmers Sucide)

शासनाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या असल्या तरी त्याचा फारसा सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळालेले नाही.विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार,जानेवारी महिन्यात ८७,फेब्रुवारीत ७६ आणि मार्चमध्ये १०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच तीन महिन्यात एकूण २६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.  

 १७७ प्रकरणे प्रलंबित (Marathwada Farmers Sucide)

शासनाकडून अशा घटनांमध्ये मृत शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.आतापर्यंत ७९ प्रकरणांत ही मदत मंजूर करण्यात आली आहे. तर १३ प्रकरणे विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आली आहेत. उर्वरित १७७ प्रकरणे अजून चौकशीसाठी प्रलंबित आहेत.