
Marathwada Univercity : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) उपकुलसचिव डॉ. हेमलता ठाकरे (Hemlata Thackeray) यांनी आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) केला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हेमलता यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट (Sucide Note) लिहिली होती. या चिठ्ठीमध्ये दोन मोठ्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यात कुलगुरू विजय फुलारी,कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सध्या संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नक्की वाचा : आलिया भट्टच्या पर्सनल असिस्टंटला अटक; बनावट सह्या करत ७७ लाखांची केली फसवणूक
हेमलता ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. बदली झाल्यावर शिपाई दिला नसल्याने फाईलचे भले मोठे गठ्ठे डोक्यावर घेऊन नवीन कार्यालयात जात असल्याचा ठाकूर यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. विविध कारणाने नोटीस काढून त्यांना छळले, असा आरोप या सुसाईट नोटमध्ये केला आहे. हेमलता ठाकरे यांच्या मुलाने त्यांना वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र अजूनही त्या शुद्धीवर आलेल्या नाहीत.
अवश्य वाचा : गुजरातमध्ये पुलाचे अचानक २ तुकडे;अनेक वाहने नदीत कोसळली,३ जणांचा मृत्यू
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय ? (Marathwada Univercity)
“आई, अमित, कल्पना आणि श्री तुम्ही मला सर्व माफ कराल अशी आशा करते. कारण मी जगाचा निरोप घेत आहे. खूप कंटाळा आलाय मला जगायचा. औरंगाबादमध्ये आल्यापासून खूप धावपळ झाली आहे. जगताना, संसार करताना आणि ऑफिसचे काम करताना खूप धावपळ झाली. संसार करताना जितका त्रास झाला नाही तितका त्रास मला माझ्या ऑफिसमुळे झाला. ऑफिसमधील सहकारी मला खूप त्रास देतात. त्यांच्या सततच्या त्रासामुळे मला आता जगण्याची इच्छा संपली आहे.”
कुलगुरू विजय फुलारी,कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर गंभीर आरोप (Marathwada Univercity)
विजय फुलारी आणि प्रशांत अमृतकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी असे लिहिले आहे की, “आता तर ऑफिसमधले विजय फुलारी हे दुसऱ्या विद्यापीठातले एक सर आहेत. ते कुलगुरू म्हणून आमच्या विद्यापीठात आले आहेत. फुलारी सर व आमच्या विद्यापीठातले प्राध्यापक प्रशांत अमृतकर या दोघांनी मिळून मला गेल्या काही महिन्यांपासून खूप त्रास दिला आहे. आई आणि बाबा, तुम्ही मला सतत सांगत होतात की सत्य वागायचे, सत्य बोलायचे, कुणी कितीही त्रास दिला तरी ते सहन करायचे, आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असे कधी वागायचे नाही. तुम्ही दिलेल्या संस्कारामुळे मी नेहमी चांगली वागले. पण तुमच्या या संस्कारामुळे माझे हात बांधले होते.
मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून मी ऑफिसच्या साहित्य चोरले,असा आळ माझ्यावर घेतला. हा आळ घेऊन माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. हे सर्व प्रकरण माझ्या मनाला खूपच लागले आहे. हा आरोप घेऊन यापुढे मी जगू शकत नाही. आई माझ्यानंतर माझ्या श्री ची तू काळजी घेशील. तू जिवंत असेपर्यंत तुझ्याजवळ त्याला ठेव. तू असे केलेस तर मला बरं वाटेल. त्याला माझी उणीव भासू देऊ नकोस. असं या नोटमध्ये लिहिलं आहे.