March : अकोलेत किसान सभेचा मोर्चा

March : अकोलेत किसान सभेचा मोर्चा

0
March

March : अकोले : संयुक्त किसान मोर्चा (Sanyukt kisan morcha) व संयुक्त कामगार कृती समितीच्यावतीने आज देशभरात ग्रामीण भारत बंद (India closed) व औद्योगिक संपाची हाक देण्यात आलेली आहे. त्यानुसार अकोले येथेही मोर्चा (March) काढून विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

नक्की वाचा : मनोज जरांगेंचा मुंबईत पुन्हा आंदोलनाचा इशारा

कामगार संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलने (March)


शेतकरी, कामगार व श्रमिकांच्या मागण्यांसाठी होत असलेल्या आंदोलनामध्ये राज्यात किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी व कामगार संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलने होत आहेत. दिल्लीच्या सीमेवर हमीभावाचा कायदा करावा या मागणीसाठी, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारच्यावतीने दडपशाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर रबरी गोळ्या, अश्रूधूर व लाठीचार्ज करून त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांवर होत असलेल्या या अत्याचाराचा आणि अन्यायाचा धिक्कार आज देशभरात शेतकरी व कामगार रस्त्यावर उतरून करत आहेत. अकोले येथेही रस्त्यावर उतरून सरकारचे याकडे लक्ष वेधले आहे.

हे देखील वाचा: नारायण राणेंना भाजपने त्यांची जागा दाखवली – विनायक राऊत

शेतकऱ्यांनी केल्या विविध मागण्या (March)


केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांचा अधिक अंत पाहू नये, शेतीचे संकट दूर करण्यासाठी शेतीमालाला रास्तभाव मिळण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव देणारा कायदा करावा, शेतीचा उत्पादन खर्च कमी करून नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल यासाठी शेतकरी केंद्री उपाययोजना कराव्यात, कामगारांवर होत असलेल्या अन्यायापासून त्यांना संरक्षण देणाऱ्या उपायोजना करून कामगार व कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची हमी देणाऱ्या उपायोजना कराव्यात अशा मागण्या संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार कर्मचारी कृती समितीच्यावतीने करण्यात आल्या आहे. किसान सभा व सीटू कामगार संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, संगीता साळवे, वैशाली सुरसे, राजाराम गंभीरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, आहार कर्मचारी, आशासेविका सहभागी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here