March : कर्जत : तालुक्याची टंचाईसदृश परिस्थिती पाहता कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने पाण्याचे टँकर (Water tankers) सुरू करण्यात आले होते. मात्र, आचारसंहिता असल्याने प्रशासनाने टँकर बंद करण्याचे आदेश दिल्याने टंचाईग्रस्त गावातील महिला, ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने कर्जतमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा (March) काढण्यात आला. यावेळी प्रशासन आणि सरकारच्या (Government) विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हे देखील वाचा: नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार
टँकर बंद झाल्याने पाण्याची टंचाई (March)
कर्जत तालुक्यात यंदा मान्सून पावसाने अल्प हजेरी दिली होती. त्यात मार्च महिन्यातच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने कर्जत तालुक्यातील काही गावांमध्ये आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने पाण्याचे टँकर गावोगावी चालू करण्यात आले होते. परंतु लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने हे टॅंकर तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले. टँकर बंद झाल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली. यामुळे टंचाईग्रस्त गावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाने तत्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
नक्की वाचा: पाय घसरून पडल्याने दिलीप वळसे पाटील जखमी
प्रशासन दबावखाली काम करत आल्याचा आरोप (March)
महिला माठ व हांडे घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या. प्रशासन हे कोणाच्या दबावखाली काम करीत आहे, असा सवाल मोर्चेकरांनी उपस्थित केला. मोर्चामध्ये कर्जतचे शहराध्यक्ष प्रा. विशाल मेहेत्रे, राष्ट्रवादीचे नेते सुनील शेलार, नगरसेवक संतोष मेहेत्रे, भास्कर भैलुमे, भाऊसाहेब तोरडमल, राजेंद्र पवार, अभय बोरा, रज्जाक झारेकरी, नगरसेविका ज्योती शेळके, सुवर्णा सुपेकर, राष्ट्रवादीचे महिला अध्यक्ष पूजा सूर्यवंशी, माधुरी लोंढे, रघुआबा काळदाते, बाळासाहेब सपकाळ, पोपटराव खोसे, राहुल नवले, मनोज गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.