March : पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा 

March : पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा 

0
March
March : पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा 

March : पारनेर : तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील महिलांनी ग्रामपंचायतीमार्फत पाणी (Water) मिळत नाही, याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.३१) सकाळी ८ वाजता ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा (March) काढला. यात महिलांनी ग्रामपंचायत पदाधिकारी विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करत पाणी उपलब्ध न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा (Warning) देण्यात आला आहे.   

हे देखील वाचा: माझ्या मतदारसंघाप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचवणार का?; रोहित पवारांचा राणांना सवाल

महिलांची पाण्यासाठी भटकंती

भोयरे गांगर्डा गावासाठी पाडळी रांजणगाव येथील कॅनल जवळ खोदलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, कॅनलचे रोटेशन संपले की दोन ते तीन दिवसात विहीर कोरडी होते. गेली अनेक दिवसांपासून विहिरीला पाणी नसल्यामुळे गावात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सांगूनही यात सुधारणा होत नसल्याने शनिवारी महिलांनी रौद्र रुप धारण केले. आमच्याकडून घरपट्टी व पाणीपट्टी नियमित घेतली जाते, मग पाणी देण्याची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला.

नक्की वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल

महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित (March)

यावेळी शोभा भिंगारदिवे, मीना लोणारे, हिराबाई पाडळे, अलकाबाई पाडळे, वैशाली पाडळे, अनिता पाडळे, सविता पाडळे, रेखाबाई पाडळे, झुंबरबाई पाडळे, सरस्वती पाडळे, अविनाश भिंगारदिवे, संपत पाडळे, संजय पाडळे, देविदास पाडळे, विशाल पाडळे, गणेश गरदारे, प्रकाश भोगाडे, विलास गांगड, हरिष पाडळे, पांडुरंग लोणारे, लक्ष्मण कापरे आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here