Marijuana : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील अंमली पदार्थ कायद्यान्वये (Narcotics) दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाचा नाश करण्याबाबत न्यायालयाची (Court) परवानगी प्राप्त झाल्यानंतर अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समितीने जिल्ह्यामध्ये जामखेड, तोफखाना, राहुरी, कर्जत, पारनेर, श्रीरामपुर शहर, शेवगाव, मिरजगाव, कोपरगाव तालुका, भिंगार कॅम्प, श्रीगोंदा व राहाता पोलीस ठाण्यातील अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल २० गुन्ह्यातील ९३३ किलो ५७० ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजाचा (Marijuana) नाश करण्यात आला.
अवश्य वाचा : परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विशेष मोहिम
महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ मुंबई यांचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन महाराष्ट्र इन्व्हीरो पॉवर लि. (रांजणगाव, एम.आय.डी.सी., ता. शिरुर जि. पुणे) या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विशेष मोहिम राबविण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक (गृह) जगदीश भांबळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस अंमलदार शामसुंदर गुजर, पंकज व्यवहारे, संतोष खैरे, अतुल लोटके, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे, जालिंदर माने, जयराम जंगले आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार
नाश करण्याची परवानगी घेऊन कार्यवाही (Marijuana)
पोलीस अधीक्षक यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाचा आढावा घेऊन गुन्ह्याचे संबधीत तपासी अंमलदार यांच्या मार्फत न्यायालयाकडुन मुद्देमाल नाश करण्याची परवानगी घेऊन कार्यवाही करणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.