Market Committee : पारनेर बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींचे राजीनामे

0
Market Committee : पारनेर बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींचे राजीनामे
Market Committee : पारनेर बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींचे राजीनामे

Market Committee : नगर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव सबाजीराव रासकर व उपसभापती किसनराव पंढरीनाथ सुपेकर यांनी आपल्या पदांचे राजीनामे (Resign) दिले आहेत. गेल्यावर्षी मार्च (March) महिन्यात या दोन्ही ज्येष्ठ संचालकांना सभापती-उपसभापती पदाची संधी मिळाली होती. आता नवीन संचालकांना (Director) संधी मिळावी, या हेतूने त्यांनी राजीनामे दिले असून, नवीन पदाधिकारी कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून खुनाचा कट रचणारा आरोपी जेरबंद

निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार

उपसभापती किसनराव सुपेकर यांनी गुरुवारी (ता. १२) सभापती किसनराव रासकर यांच्याकडे राजीनामा दिला, तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी (ता. १३) सभापती किसनराव रासकर यांनी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याकडे राजीनामा दिला. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाने लवकरच सभापती-उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

नक्की पहा : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक नेमंक काय?

शरद पवार गटाचे संख्याबळ वाढले (Market Committee)

बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता असून, १८ पैकी १७ संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. अजित पवार गटाचे अशोक सावंत हे एकमेव संचालक आहेत. तीन बैठकांना गैरहजर राहिल्याने अजित पवार गटाचे संचालक प्रशांत गायकवाड यांना जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवशे यांनी अपात्र ठरवले होते. त्यांच्या जागी रा. या. औटी यांची बिनविरोध निवड झाली असून, त्यामुळे शरद पवार गटाचे संख्याबळ वाढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here