Marriage : नगर : विवाह नोंदणी नियमात सुधारणा मसुदा सभागृहात सादर करून विवाह (Marriage) करण्यासाठी आई-वडील तथा पालकांची परवानगी (Permission) आवश्यक आणि अनिवार्य करा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे अधिवेशनादरम्यान केली.
हेही वाचा : खटल्यास विलंब; पाथर्डी तुरुंगाधिकारी व पोलिसांच्या चौकशीचे न्यायालयाने दिले आदेश
प्रस्तावित नियमांचा मसुदा
गुजरात सरकारने विधानसभेत विवाह नोंदणी नियमांत सुधारणांचा मसुदा तयार केला आहे. प्रस्तावित सुधारणेनुसार प्रेमविवाहासाठी अर्ज केल्यानंतर मुलगा-मुलीच्या पालकांना नोटीस किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सूचित केले जाईल. अर्ज दिल्यानंतर ४०व्या दिवशी विवाहाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे राज्यात अशी एक व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे पालकांच्या परवानगीने विवाह करणाऱ्यांना आणि प्रेमविवाहात आपली खोटी ओळख न दाखवणाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. नवीन व्यवस्थेत नोटरीचे काम सर्वांच्या उपस्थितीत करावे लागेल.
नक्की पहा : महिलांच्या 70 टक्के समस्या संपतील; फक्त ‘या’ 4 गोष्टी फॉलो करा
नियमांत सुधारणा आवश्यक (Marriage)
राज्य सरकार प्रेमविवाहाच्या विरोधात नाही. परंतु, मुलींची सुरक्षा, पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया मजबूत करण्यासाठी विवाह नोंदणी नियमात सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान विवाह कायद्यात व नियमात सुधारणा करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



