Marriage of a minor girl | अल्पवयीन मुलीचे लग्न उधळले; नवरदेव मंडूळ्यासह थेट पोलीस ठाण्यात

0
Marriage of a minor girl
Marriage of a minor girl

Marriage of a minor girl | पाथर्डी : अल्पवयीन मुलीसोबत पळून गेलेल्या युवकासह संबंधित मुलीला पाथर्डी (Pathardi) पोलिसांनी हुशारीने सापळा रचून ताब्यात घेतले. ‘लग्न लावून देतो’ असे सांगत मुलीकडील नातेवाईकांनी दोघांचा विश्वास संपादन केला आणि पोलिसांच्या मदतीने लग्नस्थळीच त्यांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीचे लग्न (Marriage of a minor girl) लावण्याचा प्रकार पोलिसांनी उधळून लावला.

नक्की वाचा : मोठी बातमी!१ मे पासून एटीएममधून पैसे काढणं महागणार   

फसवून पळवून नेले (Marriage of a minor girl)

पाथर्डी तालुक्यातील करंजी जवळील एका गावातील अल्पवयीन मुलीला ९ एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने फसवून पळवून नेले होते. याबाबत मुलीच्या आईने पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व सापळा रचला. त्यानुसार मुलीच्या नातेवाईकांनी ‘तुमचे लग्न लावून देतो’ असे सांगत दोघांना २९ एप्रिल रोजी पाथर्डी तालुक्यातील वैजू बाबळगाव शिवारातील दत्त मंदिरात बोलावले. त्या ठिकाणी पाथर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आधीच सापळा लावून सज्ज होते. नवरा-नवरीच्या पेहरावात दत्त मंदिरात आलेल्या दोघांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. 

अवश्य वाचा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण; ‘या’ मान्यवरांची वर्णी 

लग्नाच्या वेळी पोलीस मांडवात (Marriage of a minor girl)

नवरदेव लग्नाचा टोप, मंडूळ्या आणि लग्नाचा पोशाख परिधान करून आला होता, तर नवरी लाल साडी व पारंपरिक मंडूळ्या घालून सजली होती. मात्र, लग्नाऐवजी थेट पोलीस ठाण्याचा रस्ता त्यांना दाखवण्यात आला. “गोड बोलून माझी फसवणूक केली,” असे नवरा मुलगा सांगत आहे. मात्र, कायदेशीर कारवाई करून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे लग्न होण्यापासून थांबवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here