Mathematics : महादजी शिंदे विद्यालयाचा दीप लगड गणित विषयात बोर्डात पहिला

Mathematics : महादजी शिंदे विद्यालयाचा दीप लगड गणित विषयात बोर्डात पहिला

0
Mathematics
Mathematics : महादजी शिंदे विद्यालयाचा दीप लगड गणित विषयात बोर्डात पहिला

Mathematics : श्रीगोंदा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाने इयत्ता दहावीचा निकाल (10th Result) नुकताच जाहीर केला. त्यात रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) श्रीगोंदा संकुलातील महादजी शिंदे विद्यालयाचा निकाल ९७.१३ टक्के इतका लागला. विद्यालयाचा विद्यार्थी दीप अतुल लगड याने गणित (Mathematics) विषयात १०० गुण मिळवत बोर्डात पहिला येण्याचा मान मिळविला.

हे देखील वाचा : मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग सर्वात अव्वल

विद्यालयाला यशस्वी परंपरा

विद्यालयात दीप अतुल लगड याने ९७.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. साईराज ईश्वर नवगिरे याने ९२.०० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर राजवर्धन संजय दळवी याने ९०.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. विद्यालयाच्या २४४ विद्यार्थ्यांपैकी २३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ५३ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता, प्रथम श्रेणीत ९८ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ७२ तर १४ विद्यार्थी तृतीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.

Mathematics
Mathematics

अवश्य वाचा : कोलकाताची तिसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या जेतेपदावर मोहोर; हैदराबादला नमवले

यांचे मार्गदर्शन लाभले

यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ, पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे, गुरुकुल प्रमुख विलास लबडे, विलास दरेकर, कैलास आठरे, शिवाजी थिटे, सचिन झगडे, सुरेश टकले, दत्तात्रय मोरे, सुवर्णा शेलार, अभिमान सोनवणे, बापू जाधव, भगवान मुखेकर, सुधीर साबळे, विकास लोखंडे, सुरेश गायकवाड, लक्ष्मीकांत खेडकर,अल्ताफ पठाण, संतोष शिंदे, कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

Mathematics
Mathematics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here