Mathematics-Science Exhibition : अकोले: श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटी (Agasti Education Society) संचलित अगस्ति माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकोले (Akole) येथील विद्यालयाने ५३ व्या तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात (Mathematics-Science Exhibition) सर्वच गटात बाजी मारली असून विद्यालयाने फिरता चषक मिळविण्याचा बहुमान प्राप्त केला.
नक्की वाचा : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा
३ पुरस्कार आणि मानाचा फिरता चषक पटकावला
अकोलेतील मॉडर्न हायस्कूल येथे तीनदिवसीय तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली सर्जनशीलता जपल्याचे दिसून आले. अगस्ति विद्यालयाने या प्रदर्शनात गणित-विज्ञान विभागात वेगवेगळ्या गटात प्रथम क्रमांक तर विज्ञानमध्ये द्वितीय क्रमांक मिळवत एकूण ३ पुरस्कार मिळवले आणि मानाचा फिरता चषक पटकावला. अगस्ति विद्यालयाची आराध्या रवींद्र नाईकवाडी हिने विज्ञान विभागात उच्च प्राथमिक गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावत स्मार्ट टॉयलेट ही संकल्पना मांडत टॉयलेट दुर्गंधीमुक्त ठेऊन पाण्याची बचत करणे कसे सोईस्कर आहे हे उपकरणातून पटवून देत सर्वांचे लक्ष वेधले.
अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता; संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
स्मार्ट हेल्मेट विकसित (Mathematics-Science Exhibition)
विज्ञान विभाग उच्च माध्यमिक गटात आर्या विजय गुजर हिने प्रथम क्रमांक मिळविला. तिने सादर केलेल्या राईड सेफ २.० या नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून वाढते रस्ते अपघात आणि ड्रन्क अँड ड्राइव्हच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी हा प्रकल्प एक वरदान ठरू शकतो असे मत परीक्षकांनी नोंदवले. या प्रकल्पाने स्मार्ट हेल्मेट विकसित करून अल्कोहल डिटेक्शन सेन्सर बसवून चालकाने मद्यपान केले असेल तर ब्लुटूथ तंत्रज्ञानाने गाडीचे इंजिन बंद होते व हेल्मेट घातल्याशिवाय गाडीचं सुरु होत नाही हे आणखी एक वैशिष्ट्ये असल्याने मद्यपान विरोधी यंत्रणा म्हणून हे उपकरण अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले. तर उच्च माध्यमिक गटात गणित विभागात श्रद्धा महेश पंडित हिने प्रथम क्रमांक पटकावत गोल्डन रेशो ही संकल्पना केवळ गणितापुरती मर्यादित नसून निसर्ग, कला, अर्थशास्त्र, वैद्यकीय व संगणक विज्ञान अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरली जाते हे पटवून दिले. या नावीन्यपूर्ण उपकरणाने पाहुण्यांसह भेट देणाऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.



