Mayamba : अमावस्येच्या दुर्मिळ संयोगात नाथभक्तांचा मढी-मायंबात महामेळा 

Mayamba : अमावस्येच्या दुर्मिळ संयोगात नाथभक्तांचा मढी-मायंबात महामेळा 

0
Mayamba : अमावस्येच्या दुर्मिळ संयोगात नाथभक्तांचा मढी-मायंबात महामेळा 
Mayamba : अमावस्येच्या दुर्मिळ संयोगात नाथभक्तांचा मढी-मायंबात महामेळा 

Mayamba : पाथर्डी : दोन दिवसीय अमावस्या पर्वाच्या दुर्मीळ संयोगानिमित्त लाखो नाथ भक्तांनी (Nath Bhakt) मढी येथील कानिफनाथ मंदिर, मायंबा (Mayamba) (आष्टी) येथील मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी (Machhindranath Sanjivan Samadhi), वृद्धेश्वर (Vriddheshwar) येथील आदिनाथ मंदिर आणि सावरगाव येथील प्राचीन शनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली. शुक्रवारची पोळ्याची आणि शनिवारची शनी अमावस्या यामुळे तालुक्यातील तीर्थक्षेत्रांवर भाविकांचा ओघ अखंड सुरू होता.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांतील गण रचनेत मोठा फेरबदल; अंतिम गट-गण रचना जाहीर

वाहनांच्या लांबच लांब रांगा

मोहटादेवी आणि धामणगाव येथील जगदंबा देवी मंदिरांनाही भक्तांनी गर्दी केली. मढी आणि मायंबा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. राज्यभरातून आलेल्या हजारो भक्तांनी मढी आणि मायंबा येथे मुक्काम करून या पावन पर्वाचा लाभ घेतला.

Mayamba : अमावस्येच्या दुर्मिळ संयोगात नाथभक्तांचा मढी-मायंबात महामेळा 
Mayamba : अमावस्येच्या दुर्मिळ संयोगात नाथभक्तांचा मढी-मायंबात महामेळा 

अवश्य वाचा : “मनोज जरांगे यांनी कागद अन् पेन घेऊन सरकार समोर आरक्षणाबाबत चर्चेला बसावं”- चंद्रकांत पाटील

शनिवारी दिवसभर गर्दीचा ओघ (Mayamba)

शुक्रवारी सकाळी सुरू झालेली अमावस्या शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता संपली. मात्र सुर्याने पाहिलेली अमावस्या म्हणून शनिवारी सुद्धा दिवसभर गर्दीचा ओघ नाथ भक्तांचा दर्शनासाठी सुरू होता. भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भक्तांनी आनंद घेतला.