Maylek Movie:’मायलेक’मध्ये अभिनेता उमेश कामत साकारणार महत्वपूर्ण भूमिका

मायलेक या चित्रपटातील नवीन पोस्टर पाहिल्यावर या चित्रपटामध्ये उमेशची नेमकी भूमिका काय असणार, हे मात्र उत्सुकता वाढवणारे आहे. दरम्यान, या चित्रपटात उमेश एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.

0
Maylek Movie

नगर : सोनाली खरे (Sonali Khare) आणि सनाया आनंद (Sanaya Anand) यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मायलेक’ लवकरच प्रदर्शित होत आहे. आई मुलीच्या सुंदर, संवेदनशील नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. आता या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर आला आहे. ‘मायलेक’मध्ये उमेश कामतचीही महत्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून पोस्टरमध्ये उमेश सनाया आणि सोनाली सोबत दिसत आहेत.

नक्की वाचा : राजस्थानचा सलग तिसरा विजय;मुंबईचा घरच्या मैदानावर नमवले

मायलेक चित्रपटामध्ये उमेशची नेमकी भूमिका काय?(Maylek Movie)

मायलेक या चित्रपटातील नवीन पोस्टर पाहिल्यावर या चित्रपटामध्ये उमेशची नेमकी भूमिका काय असणार, हे मात्र उत्सुकता वाढवणारे आहे. दरम्यान, या चित्रपटात उमेश एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाचे  कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. या चित्रपटात बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या ही  प्रमुख भूमिका आहेत.

अवश्य वाचा : नगरच्या पहिल्या खासदाराने जनतेसाठी फोडलं होतं सरकारी गोदाम

उमेश कामतने सांगितली भावना (Maylek Movie)

आपल्या भूमिकेबद्दल उमेश कामत म्हणतो, ‘आई आणि मुलीच्या सुंदर नात्याची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे आणि अशा चित्रपटाचा मी भाग आहे. मी स्वतः या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. माझ्या व्यक्तिरेखेबद्दल जास्त काही सांगणार नाही. मात्र एक नमूद करेन, माझ्या इतर भूमिकांपेक्षा ही भूमिका निश्चितच वेगळी आहे. सोनाली आणि सनायासोबत काम करायचा अनुभवही भन्नाट होता. सोनाली एक उत्तम अभिनेत्री आहे.  हे सर्वांना माहित आहेच परंतु, सनाया मध्ये हे गुण आहेत. सनायालाही अभिनयाची उत्तम जाण आहे. ही ‘मायलेक’ची जोडी भन्नाट आहे. रिअलमध्ये ही जोडी कमाल असल्याने रिलमध्येही ही केमिस्ट्री उत्तम जुळून आली आहे, असं त्याने सांगितले. येत्या १९ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here