Maza Ladka Bhau Yojana: मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करणार? वाचा सविस्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा केलीय. या योजनेतील लाभार्थी तरुणांच्या बँक खात्यांमध्ये सरकार विद्या वेतन म्हणून ६ ते १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करणार आहे.

0
Maza Ladka Bhau Yojana: मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करणार? वाचा सविस्तर
Maza Ladka Bhau Yojana: मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करणार? वाचा सविस्तर

नगर :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा केलीय. या योजनेतील लाभार्थी तरुणांच्या बँक खात्यांमध्ये सरकार विद्या वेतन (Education Salary) म्हणून ६ ते १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करणार आहे. आता या योजनेसाठी अर्ज कश्या पद्धतीने भरायचा याबाबद्दलची माहिती आज आपण जाणून घेऊयात..

नक्की वाचा : महिलांसाठी गुडन्यूज!लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते रक्षाबंधनला मिळणार

ऑनलाईन अर्ज कसा करावा ? (Maza Ladka Bhau Yojana)

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना तरुणांना यासाठी महाराष्ट्र सरकारच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. महाराष्ट्र सरकारची लाडका भाऊ योजनेसाठी ही अधिकृत वेबसाईट आहे. तिथे होम पेज उघडल्यानंतर New User Registration या बटनावर क्लिक करावं लागेल. तिथे क्लिक केल्यानंतर लगेच पुढे अर्ज ओपन होईल. या अर्जात विचारलेली सर्व माहिती तरुणांना अतिशय काळजीपूर्वक पणे भरायची आहे. यानंतर अर्जात मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमीट बटनवर क्लिक केलं की हि ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

अवश्य वाचा : ‘झी मराठी’ने केली नव्या मालिकेची घोषणा; मालिकेचा फर्स्ट लूक आला समोर

ऑफलाईन अर्ज कसा करावा? (Maza Ladka Bhau Yojana)

महाराष्ट्रातील तरुण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑफलाईन देखील अर्ज करु शकतील. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी  सर्वात आधी तरुणांना ‘महाराष्ट्र माझा लाडका भाऊ योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. तिथे अर्ज डाऊनलोड करण्याच्या बटनवर क्लिक करावं लागेल. त्या अर्जाची प्रिंट काढावी लागेल. यानंतर तो अर्ज पूर्ण भरावा लागेल. तसेच तो अर्ज नेमका जमा कुणाकडे करावा याबाबतही माहिती दिलेली असेल. त्यानुसार तो अर्ज संबंधित ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने जमा करावा लागेल.

कोणत्या तरुणांना किती पैसे मिळणार?

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार या योजनेतून लाभार्थी तरुणांसाठी तीन प्रकारचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी, डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी आणि पदवीधर विद्यार्थी अशा तीन प्रकारचं शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना सरकार सहा महिन्यांची इंटर्नशिप मिळवून देणार आहे. तसेच प्रत्येकाला दर महिन्याला सरकारकडून प्रशिक्षणार्थी पैसे दिले जाणार आहेत.

 १२ वी उत्तीर्ण तरुणांना महिन्याला ६ हजार रुपये मिळतील.

आय.टी.आय किंवा डिप्लोमा केलेल्या तरुणांना दर महिन्याला ८  हजार रुपये मिळतील.

पदवीधर तरुणांना दर महिन्याला १० हजार रुपये पैसे सरकारकडून दिले जाणार आहेत.

*मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता अटी * 

संबंधित तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.

दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तरुणाचं वय हे १८ ते ३५ वयोगटाच्या आत असावं.

तरुणाचं शिक्षण हे १२ वी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर इतकं झालेलं असावं.

या योजेनचा लाभ घेणारा तरुण हा बेरोजगार असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळेल

तरुणाचं बँक खातं आधारकार्डशी लिंक केलेले असावे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

आधारकार्ड
अधिवास प्रमाणपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स
जन्म दाखला किंवा वयाचा दाखला
शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
बँक खाते पासबुक

अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. या सगळ्या अटींची पूर्तता जे तरुण करतील ते त्याच तरुणांना मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेचा लाभ घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here