Mazi Ladki Bahin Yojana : तिजोरी रिकामी झाल्यावर नियम; लाडकी बहिण योजेनवरून कुलकर्णी यांचा टोला

Mazi Ladki Bahin Yojana : तिजोरी रिकामी झाल्यावर नियम; लाडकी बहिण योजेनवरून कुलकर्णी यांचा टोला

0
Mazi Ladki Bahin Yojana : तिजोरी रिकामी झाल्यावर नियम; लाडकी बहिण योजेनवरून कुलकर्णी यांचा टोला
Mazi Ladki Bahin Yojana : तिजोरी रिकामी झाल्यावर नियम; लाडकी बहिण योजेनवरून कुलकर्णी यांचा टोला

Mazi Ladki Bahin Yojana : अकोले: विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) राज्यात महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली. याचा मोठा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला. बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र, आता निवडणूक झाल्यानंतर सरकारकडून या योजनेबाबत अनेक निकष जाहिर करण्यात आले आहेत. आता याच निकषावरून सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb kulkarni) यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

नक्की वाचा : रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार,नितीन गडकरींची घोषणा

कुलकर्णी म्हणाले,

लाडकी बहीण योजनेची नव्याने पडताळणी सुरू करून खोटे लाभार्थी शोधले जाणार आहेत. निवडणुकीपूर्वी लाभार्थी यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, मतांसाठी दुखावले नाही आणि आता तिजोरी खाली दिसल्यावर नियम जागे झाले आहेत. इतके नेत्यांचे वागणे स्वार्थी आहे.

अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

श्रीमंत लोक गरिबांना बाजूला ढकलून आपण गरीब असल्याचे दाखवताहेत (Mazi Ladki Bahin Yojana)

पण मला वेगळा मुद्दा मांडायचा आहे. श्रीमंत महिलांना पैसे घेताना काहीच वाटत नसेल का? मला श्यामची आई आठवली. श्याम एकदा कुठेतरी जेवायला गेल्यावर तिथे दक्षिणा दिली जाते. श्यामने ते पैसे घरी आणल्यावर त्याची आई रागावते व म्हणते आपण भिक्षुक नाही त्यामुळे असे फुकटचे पैसे घ्यायला नको. ते पैसे ती त्याला मंदिरात नेऊन ठेवायला सांगते आणि विशेष म्हणजे श्यामच्या आईची परिस्थिती गरीब आहे, घरावर जप्ती येते, इतके दारिद्र्य आहे, तरीही आपण फुकटचे काही घेऊ नये ही भावना आहे. या पार्श्वभूमीवर आज बंगले, गाड्या असणारे असल्या दीड हजारांसाठी आपला आत्मसन्मान विसरून गरिबांच्या रांगेत उभे राहतात, हे कसे समजून घ्यायचे? पूर्वी गरीब माणसे आपली गरिबी लपवून आपण इतरांसारखे आहोत, असा आव आणायचे. आता श्रीमंत अशा योजना, आरक्षण यांचे लाभ मागताना गरिबांना बाजूला ढकलून आपण गरीब असल्याचे दाखवत राहतात.