MCOCA : ‘त्या’ आरोपींवर मकोका अंर्तगत कारवाई करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन

MCOCA : 'त्या' आरोपींवर मकोका अंर्तगत कारवाई करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन

0
MCOCA : 'त्या' आरोपींवर मकोका अंर्तगत कारवाई करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन
MCOCA : 'त्या' आरोपींवर मकोका अंर्तगत कारवाई करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन

MCOCA : नगर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) (Republican Party of India (Athawale)) तर्फे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे (Sunil Salve) यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून आरोपींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची तसेच साळवे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण (Police Protection) देण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांसाठी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.

नक्की वाचा: मेल्यानंतरही मरण यातना; भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार!

मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित

यावेळी राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजयराव साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राज्य उपाध्यक्ष दीपकराव गायकवाड, अमित काळे, विभागीय अध्यक्ष भीमा बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, राजू बडे, राजू जगताप, बाबा राजगुरू, आदिनाथ भोसले, विजय भांबळ, संजय कांबळे,विलास साळवे, सुरेश भागवत, महेश अंगारखे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

अवश्य वाचा : मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांसाठी कर्जतहून प्रेमाची शिदोरी

जुना राग मनात धरून साळवे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला (MCOCA)

जामखेड तालुक्यातील नान्नजमध्ये गुंडांची टोळी कार्यरत असून, गावात दहशत निर्माण करणे, नागरिकांना मारहाण करणे, दुकानदार व वाहनचालकांकडून खंडणी उकळणे, व याच टोळीतील गुंडांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला होता. त्यावेळेस साळवे यांनी गाव बंद केले होते. याचा राग मनात धरून साळवे यांच्या कुटुंबीयांवर तलवार, कोयते, लोखंडी रॉडसह जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.