
Mechanized Infantry Center and School : नगर : मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल (Mechanized Infantry Center and School), अहिल्यानगरमधील माजी सैनिक (Ex-servicemen), वीरनारी तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने ‘मिशन निरंतर मिलाप १.०’ (Mission Nirantar Milap) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ‘निरंतर मिलाप टीम’ला आज ब्रिगेडियर पी. सुनील कुमार (Brigadier P. Sunil Kumar) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
नक्की वाचा: तुम्ही दादागिरी ची भाषा मला शिकवू नका, तो धंदा आमचा : मंत्री गुलाबराव पाटील
माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी सोडविण्याचा उद्देश
हा उपक्रम लेफ्टनंट जनरल पी. एस. शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पित करण्यात आला असून, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणी त्यांच्या दारातच सोडविणे, हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमास लेफ्टनंट कर्नल अशोक कुमार (चीफ रेकॉर्ड ऑफिसर व कमांडिंग ऑफिसर, रेकॉर्ड्स, मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट) तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाच राज्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन संवाद साधणार (Mechanized Infantry Center and School)
या टप्प्यातील ‘निरंतर मिलाप टीम’मध्ये एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर, दोन नॉन कमिशन्ड ऑफिसर्स तसेच मेकॅनाइज्ड इन्फंट्री बटालियनचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. ही टीम केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या दक्षिण भारतातील पाच राज्यांतील १४ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन माजी सैनिक, वीरनारी व शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी संवाद साधणार आहे. त्यांच्या तक्रारी, निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा, कल्याणकारी योजना आदी विषयांवर जागेवरच मार्गदर्शन करून समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा: मुंबईत कोण महापौर होणार?, प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे अन् राऊतांना टोले
या उपक्रमामुळे रेजिमेंट व तिच्या माजी जवानांच्या कुटुंबीयांमधील भावनिक नाते अधिक दृढ होणार असून, त्यांच्या समस्या समजून घेत सन्मान, संवेदना व तत्परतेने मदत करण्याची भावना अधिक बळकट होणार आहे.
‘मिशन निरंतर मिलाप’ हा उपक्रम केवळ प्रशासकीयच नव्हे तर मानवी दृष्टिकोनातून राबविण्यात येत असून, देशासाठी सेवा बजावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी रेजिमेंट खंबीरपणे उभी आहे, हा संदेश यातून दिला जात आहे.


