Medha Kulkarni : फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी : मेधा कुलकर्णी

Medha Kulkarni : फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी : मेधा कुलकर्णींनी

0
Medha Kulkarni : फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी : मेधा कुलकर्णींनी
Medha Kulkarni : फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी : मेधा कुलकर्णींनी

Medha Kulkarni : नगर : भाजपच्या (BJP) राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनीही भाजपच्या पराभावाचं कारण सांगितलं आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या पराभवाचे कारण जाणून घेण्यासाठी, त्या नगरमध्ये आल्या होत्या. त्यावेळी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नक्की वाचा: “मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल?”; पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात माजी खासदार सुजय विखे यांचा पराभव नक्की कशामुळे झाला याचा आणि इतर कारणांचा आढावा घेण्यासाठी भाजपाने निरीक्षक म्हणून खासदार मेधा कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि आढावा घेतला. दरम्यान, येथील लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे यांच्यात जोरदार लढत झाली. अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या या लढतीत निलेश लंकेंनी विखे पाटलांचा बुरज पाडला. सुजय विखेंना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाने जो 400 पारचा नारा दिला आणि भाजपाला संविधान बदलण्यासाठीच 400 खासदार हवे आहेत असा नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी झाले. त्यामुळं भाजपला काही ठिकाणी अपयश आले असं खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हंटलंय.

Medha Kulkarni : फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी : मेधा कुलकर्णींनी
Medha Kulkarni : फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी : मेधा कुलकर्णींनी

अवश्य वाचा : पोलीस भरतीसाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू; या रस्त्यावर राहणार एकेरी वाहतूक

गुंड गजा मारणेला का भेटले? लंकेंना सवाल (Medha Kulkarni)

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार निलेश लंके यांच्यावरही कुलकर्णी यांनी टीकेची तोफ डागली. निलेश लंके यांनी निवडून आल्यानंतर आपल्याला भाजपच्या स्टेजवर असलेल्या काही लोकांची मदत झाल्याचे म्हटले होते. त्यावरुन, मेधा कुलकर्णी यांनी निशाणा साधत आधी खासदारांनी हे सांगावं की तुम्ही गुंड गजा मारणेला का भेटले, असा सवाल खासदार कुलकर्णी यांनी विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here