Medical College : नगर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) घेतलेल्या परीक्षेचा (Exam) निकाल नुकताच लागला. काकासाहेब म्हस्के होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजने (Medical College) यंदाही यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
नक्की वाचा: नगरकरांवर पाणी कपातीचे संकट
कॉलेजची यशस्वितेची परंपरा
काॅलेजचा बी.एच.एम.एस.च्या अंतिम वर्षाचा निकाल ८७ टक्के लागला आहे. यामध्ये श्रनया राधाकृष्णन वाॅरियर (६७ टक्के) हिने पहिला, निखील संजय गायकवाड (६५ टक्के) याने दुसरा तर इल्सा आफताब आलम अन्सारी (६४ टक्के) हिने तिसरा क्रमांक पटकावला.बी.एच.एम.एस.च्या तृतीय वर्षांचा निकाल ७७ टक्के लागला असून वैष्णवी बाळासाहेब मावळे (६८ टक्के) हिने पहिला, मोनिका रावसाहेब जाधव (६६ टक्के) हिने दुसरा तर दीपिका शेषराव ढाकणे (६५ टक्के) हिने तिसरा क्रमांक प्राप्त केला. बी.एच.एम.एस.चा दुसऱ्या वर्षाचा निकाल ८० टक्के लागला असून यामध्ये प्रतीक दत्तात्रय गाडगे (६९%) याने पहिला, वैष्णवी सुभाष गिरम (६५.३३ टक्के) हिने दुसरा तर मैत्रेयी माणिक जाधव (६५ टक्के) हिने तिसरा क्रमांक मिळविला.
हे देखील वाचा: सुप्याच्या एमआयडीसीत खंडणी बहाद्दर गोळा झालेत – राधाकृष्ण विखे पाटील
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव (Medical College)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त डॉ. सुभाष म्हस्के, विश्वस्त डॉ. सुमती म्हस्के, विश्वस्त डॉ. अभितेज म्हस्के, विश्वस्त डॉ. दिप्ती ठाकरे, संस्थेचे मुख्य प्रशासक आर्किटेक्ट समीर ठाकरे, काॅलेजच्या प्राचार्या डॉ. अनुराधा पाटणकर, डॉ.निलिमा भोज आदींनी गौरव केला.