Union Budget 2025:औषधं होणार स्वस्त;अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांची घोषणा 

0
Union Budget 2025:औषधं होणार स्वस्त;अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांची घोषणा 
Union Budget 2025:औषधं होणार स्वस्त;अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांची घोषणा 

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत अर्थसंकल्प २०२५- २६(Budget2025-25) सादर केला. या अर्थसंकल्पात कॅन्सरग्रस्त रुग्णांना (Cancer patients) दिलासा देत कॅन्सरच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची घोषणा केली आहे. ३६ औषधांवरील करात सूट (Tax suit) देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आता ३६ औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे ही औषधे स्वस्त होणार आहेत. तसेच सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये पुढच्या तीन वर्षांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी केली.

नक्की वाचा : १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री;केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पात घोषणा   

औषधे होणार स्वस्त (Union Budget 2025)

आता ३६ जीवरक्षक औषधे स्वस्त होणार आहेत. ३६ औषधांवरील कस्टम ड्यूटी हटवण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. तसेच ६ जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी ५ टक्क्यापर्यंत कमी करण्याची घोषणाही त्यांनी केली.

अवश्य वाचा : शेतकऱ्यांना मोठा दिलासा;सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ  

वैद्यकीय महाविद्यालयात जागा वाढणार (Union Budget 2025)

अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आरोग्य क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १० हजार अतिरिक्त जागा आता वाढवण्यात येणार आहेत. तसेच ५ वर्षांत ७५ हजार जागा वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे,अशी घोषणाही करण्यात आली आहे. याबरोबरच देशभरातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. त्यामध्ये २०२५-२६ या वर्षामध्ये जवळपास २०० डे केअर कॅन्सर सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here