Megha Ghadge : अभिनेत्री मेघा घाडगे झळकणार ‘अप्सरा’ चित्रपटात

‘अप्सरा’ या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेता विठ्ठल काळे झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.

0
Megha Ghadge
Megha Ghadge

नगर : नृत्य अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या मेघा घाडगे यांनी अनेकदा सशक्त अभिनेत्री म्हणून स्वतःचा ठसा उमटवला आहे. आता ‘अप्सरा’ (Apsara) या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेता विठ्ठल काळे (Vitthal Kale) झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून चित्रपट हा रोमँटिक असावा असा अंदाज बांधता येतो.    

नक्की वाचा : आयपीएलच्या रणसंग्रामात राजस्थान व दिल्ली आमने सामने

चंद्रकांत पवार यांनी केले चित्रपटाचे दिग्दर्शन (Megha Ghadge)

सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची  कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. पवार यांनी दिग्दर्शक म्हणून यापूर्वी ‘विठ्ठला शप्पथ’ हा उत्कृष्ट चित्रपट दिला आहे. आता ‘अप्सरा’ या चित्रपटातून आणखी एक नवी गोष्ट घेऊन ते आपल्या भेटीला येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी आता उत्सुकता आहे. चित्रपटातील इतर कलाकारांची नावे अजून जाहीर केली नसली तरी लवकरच जाहीर होतील.  

अवश्य वाचा : नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार

अभिनेते विठ्ठल काळे चित्रपटाची जमेची बाजू  (Megha Ghadge)

मेघा घाडगे यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्यातील अभिनेत्रीचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहे. मात्र ‘अप्सरा’ हा चित्रपट त्यांच्यासाठी वेगळा ठरणार आहे. कारण या चित्रपटात त्या साकारत असलेली भूमिका ही अनोखी असून ती नक्की कोणती आहे? यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागणार आहे. तसेच आपल्या बहुआयामी भूमिकेतुन आणि आपल्या बोलक्या डोळ्यातुन अभिनयाची मोहोर उमटवणारे अभिनेते विठ्ठल काळे हे देखील चित्रपटाची जमेची बाजू असणार आहेत.

आपल्या रसभरीत गीतातून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गीतकार मंगेश कांगणे यांनी या चित्रपटातील गाण्यांना आपल्या शब्दांनी स्वरबद्ध केले आहे. त्यामुळे मजबूत कथेला कसलेल्या अभिनयाची साथ आणि त्यावर उत्तम संगीताचा तडका प्रेक्षकांना नक्कीच अनुभवता येईल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here