MERC : नगर : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) दिलेल्या वीज दर पुनरावलोकन आदेशामुळे मोठ्याप्रमाणात वीज दरवाढ (Electricity Rate Hike) होणार आहे. त्यामुळे औद्योगिक (Industrial), व्यावसायीक क्षेत्रावर १५ ते ३० टक्के वीज दरढीचा बोजा पडणार असल्याने भविष्यात सर्वसामान्यांनाही महागाईच्या मोठ्या धोक्याला सामोरे जाण्याची शक्यता आहे. याचा दूरगामी परिणाम लघु उद्योजक, विविध व्यवसायीकांवर होणार असल्याने हा आदेश तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन सह आमी संघटना, व्यापारी असोसिएशन, उदयोजकांनी (Entrepreneurs) केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना निवेदन देण्यात आले आहे.
नक्की वाचा : ‘मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात’, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
दरवाढीचा निर्णय राज्यातील उद्योगधंद्यांना मारक
यावेळी ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनचे जिल्हा संचालक अमित काळे, दिगंबर हरीश्चंद्रे, भूषण बंग, ओम काळे, मनोहर शहाणे, अर्जुन ससे, व्यापारी असोसिएशनचे मंगेश निसळ आदींसह उद्योजक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. २५ जून रोजी जारी झालेला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचा पुनरावलोकन आदेशामुळे निर्माण झालेल्या गंभीर आणि दिशाभूल करणाऱ्या वीज दरवाढीचा निर्णय राज्यातील उद्योगधंद्यांना पंगू करणारा व ऊर्जा क्षेत्राला मारक ठरणारा आहे.
अवश्य वाचा : ‘मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार’-सुप्रिया सुळे
सर्वसामान्यांना लागणार महागाईची झळ (MERC)
या आदेशामुळे वीजदरात वाढ होणार आहे. याचा परिणाम उद्योग, हॉटेल, हॉस्पिटल, मॉल आदी क्षेत्रावर होणार असून सर्वसामान्यांना महागाईची झळ लागणार आहे. त्यामुळे राज्यातील उद्योग धंदे इतर राज्यांमध्ये जाण्याची खूप मोठी शक्यता आहे. ही दरवाढ कमी करावी, अशी मागणी सर्व संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, असे काळे यांनी सांगितले. उमेश रेखे म्हणाले, ही वीज दर वाढीचा अध्यादेश त्वरित मागे घेण्यासाठी पूर्ण राज्यात विविध संघटना, उद्योजक, व्यापारी आंदोलन करणार आहेत. नवीन दररचनेमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या वीजबिलात दहा टक्के घट होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जुलै २०२५ पासून मिळणारी वीजबिले मार्च महिन्याच्या तुलनेत वाढलेली दिसणार आहेत. या दरवाढीचा आम्ही निषेध करत आहोत.