नगर : राज्यातील आमदार (MLA), खासदारांसाठी (MP) राखीव असलेल्या म्हाडाच्या घराची किंमत (MHADA house price) आता अवघी साडेनऊ लाख रुपये झाली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने नुकतीच पाच हजारांहून अधिक घरांची लॉटरी (Housing lottery) जाहीर केली आहे. त्यात नियमानुसार, वेगवेगेळ्या राखीव गटांप्रमाणेच आमदार, खासदारांसाठी ९५ घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. यामध्ये कल्याणमधील एका घराचा समावेश असून, त्याची किंमत केवळ नऊ लाख ५५ हजार ८०० रुपये एवढी आहे. हे अत्यल्प उत्पन्न गटातील घर आजी-माजी आमदार-खासदारांसाठी राखीव आहे. त्यामुळे आता या घरांसाठी कोणते आमदार खासदार अर्ज करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
नक्की वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून २८५ घरांच्या विक्रीसाठी लॉटरी (MHADA Lottery 2025)
म्हाडाच्या कोकण मंडळाने पाच हजार २८५ घरांच्या विक्रीसाठी ही लॉटरी जाहीर केली आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी ही घरे आहेत. त्याच्या किमती साडेनऊ लाखांपासून ५२ लाखांपर्यंत आहेत. यात ११ ठिकाणी अत्यल्प, अल्प उत्पन्न गटातील ९५ घरे राखीव आहेत. याबाबत म्हाडाकडे विचारणा केली असता महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम १९७६ नुसार उत्पन्न गटानुसार आमदार-खासदारांसाठी काही घरे राखीव ठेवावी लागतात. या घरांसाठी आमदार-खासदारांकडून अर्ज न आल्यास ती खुल्या वर्गातील अर्जदारांना उपलब्ध होतात, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अवश्य वाचा : अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश
कुठे आहेत राखीव घरे ? (MHADA Lottery 2025)
ठिकाण – उत्पन्न गट किंमत (लाखांत) घरांची संख्या
कल्याण – अत्यल्प – ९.५५ ते ११.३२ – १
टिटवाळा – अल्प – १७.१८ ते ३०.५६ – १
नवी मुंबई – अत्यल्प – ८.५९-२
कल्याण – अत्यल्प – १९.६० ते १९.९५ – १
विरार- अत्यल्प १३.२९ – १
ठाणे – अल्प – २० ते २१ – १
वसई – अल्प – १४ ते १८-१
कल्याण अल्प – २१-२२ – ४९
शिरढोण – अल्प – ३५.६६ – ११