MI vs RCB: मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर केली आरसीबीची धुळधाण

इशान किशन, रोहित शर्मा आणि विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने शानदार विजय मिळवला.

0
MI vs RCB
MI vs RCB

नगर : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) घरच्या मैदानावर अवघ्या १५.३ षटकांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bengaluru) ७ गडी राखून पराभव केला. आरसीबीने प्रथम खेळताना १९६ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला झंझावाती सुरुवात करून दिली. रोहित आणि किशन यांच्यात १०१ धावांची स्फोटक भागीदारी झाली. इशान किशन, रोहित शर्मा आणि विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने हा शानदार विजय मिळवला आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय;‘पीएसआय’ पदाची शारीरिक चाचणी लांबणीवर  

सूर्या- ईशानची दमदार फलंदाजी  (MI vs RCB)

सूर्यकुमार यादवने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत दमदार फलंदाजी करत अवघ्या १९ चेंडूत ५२ धावा केल्या. मुंबईच्या फलंदाजीची सुरूवात खूप चांगली झाली. इशान किशन ने चौकार-षटकारांच्या आतिषबाजीसह मुंबईच्या विजयाचा पाया रचला. तर गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेत आरसीबीला लागोपाठ धक्के दिले. इशान किशनने ३४ चेंडूत ५ षटकार आणि ७ चौकारांसह ६९ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने संधी मिळताच फटके लगावले. रोहित शर्माने २४ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ३८ धावा केल्या. यानंतर हार्दिकनेही शानदार खेळी करत ६ चेंडूत ३ षटकारांसह २१ धावा केल्या आणि विजयी षटकाराने संघाला विजय मिळवून दिला.

अवश्य वाचा :  सलमान खानचे चाहत्यांना मोठे गिफ्ट;ईदनिमित्त केली नव्या चित्रपटाची घोषणा  

आरसीबीने पुन्हा गमावला सामना (MI vs RCB)

आरसीबीने आयपीएलमधील सलग चौथा पराभव नोंदवला आहे. पुन्हा एकदा संघांच्या गोलंदाजांनी निराश केले आहे. १० षटके आणि १०० धावांचा टप्पा मुंबईने गाठल्यानंतर संघाला पहिली विकेट मिळवण्यात यश आले. पॉवर प्ले मध्ये इशान ने सर्वच गोलंदाजांची धुलाई केली. सिराज या सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नाही. आकाशदीप, विजयकुमार आणि विल जॅक्स यांना प्रत्येकी एक विकेट मिळवता आली. पण तोवर सामना संघाच्या हातातून निसटला होता.  

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली. मुंबईचा दमदार गोलंदाज बुमराहने तिसऱ्या षटकात विराट कोहलीला इशान किशन कडून विकेटच्या मागे झेलबाद केले. तर विराट कोहली अवघ्या ३ धावांवर बाद झाला. यानंतर विल जॅकने ८ धावांवर विकेट गमावली. त्यानंतर आलेल्या रजत पाटीदारने शानदार खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने २६ चेंडूत ५० धावा केल्या.

दुसऱ्या बाजूला असलेल्या कर्णधार फाफ डू प्लेसिसने ४१ चेंडूत ६१ धावा करत संयमी फलंदाजी केली. मात्र,ग्लेन मॅक्सवेल खाते न उघडताच बाद झाला. मॅक्सवेल ला श्रेयस गोपाल ने एलबीडब्ल्यू केले. यानंतर आलेल्या फलंदाजांना बुमराहने माघारी पाठवले. पण २३ चेंडूत ५३ धावांची नाबाद खेळी करत कार्तिकने संघाची धावसंख्या १९६ धावांवर नेली. तर मुंबईकडून बुमराहने ५, कोएत्झी,आकाश मधवाल आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी १ विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here