MI vs SRH: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आज आमने सामने

सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सला पहिल्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघ आज यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवण्यासाठी आतूर असतील.

0
MI vs SRH
MI vs SRH

नगर : हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्त्वातील सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यात आज लढत होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशन स्टेडियम ही मॅच पार पडेल.

नक्की वाचा : शुभमनला ऋतुराज भरला भारी;चेन्नईचा गुजरातवर ६३ धावांनी विजय

सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स पैकी कोण जिंकणार? (MI vs SRH)

सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सला पहिल्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघ आज यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवण्यासाठी आतूर असतील. हार्दिक पांड्याला अजून एक धक्का बसला आहे. कारण मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला नॅशनल क्रिकेट अकादमीकडून फिट असल्याचं प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे तो आणखी एका मॅचला मुकला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सात मॅचेसमध्ये होम ग्राऊंड असलेल्या टीमनं मॅच जिंकल्या आहेत. हा ट्रेंड ब्रेक करण्याची संधी मुंबई इंडियन्सकडे आहे.

हेही पहा : अजय महाराज बारस्कर यांचे मनोज जरांगेंवर पुन्हा गंभीर आरोप

मुंबईच्या फलंदाजांना करावी लागणार चांगली कामगिरी (MI vs SRH)

मुंबई इंडियन्सला गुजरातबरोबर पहिल्या मॅचमध्ये ६ धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे आता हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. रोहित शर्मासह ईशान किशनला चांगल्या धावा काढाव्या लागतील. याशिवाय तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या, टीम डेविड यांच्यावर फलंदाजांची जबाबदारी असेल.

हैदराबादकडून मयांग अग्रवाल, राहुल त्रिपाठी हे सामन्याची सुरुवात करु शकतात. एडेन मार्करम, हेनरिक क्लासेन,अब्दुल समाद,शहाबाज अहमद हे हैदराबादच्या बॅटिंगची धुरा सांभाळतील. तर हैदराबादच्या बॉलिंगची धुरा मार्को जानसन, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन यांच्यावर असेल. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here