Microsoft Windows Outage:जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन; बँका, विमानतळांचं काम खोळंबले!

जगभरातील यूजर्सना मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे.

0
Microsoft Windows Outage: जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन; बँका, विमानतळांचं काम खोळंबले!
Microsoft Windows Outage: जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन; बँका, विमानतळांचं काम खोळंबले!

Microsoft Windows Outage: जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन; बँका, विमानतळांचं काम खोळंबले!नगर : जगभरातील यूजर्सना मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) यंत्रणेत बिघाड झाल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद (laptop closed) पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. यामुळे जगभरातील बॅंका आणि विमानतळाचे कामदेखील थांबलं आहे. महत्त्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्ट कंपनीने या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

नक्की वाचा : निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा;’पिपाणी’चिन्ह गोठवले

मायक्रोसॉफ्टने घेतली तक्रारींची दखल (Microsoft Windows Outage)

एक्स या समाजमाध्यावर पोस्ट शेअर करत अनेक यूजर्सने याबाबत तक्रार केली आहे. काम करत असताना अचानक त्यांचे लॅपटॉप बंद पडत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच तुमचा संगणक अडचणीत असून रिस्टार्ट करणे आवश्यक आहे, असे संदेश स्क्रीनवर येत असल्याचेही या यूजर्स ने सांगितले आहे. मायक्रोसॉफ्टने या तक्रारींची दखल घेतली आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत मायक्रोसॉफ्टने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील संगणक आणि लॅपटॉप प्रभावित झाले आहेत. आम्ही याची दखल घेतली असून याबाबत माहिती घेत आहोत. लवकर ही सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कंपनीने म्हटलं आहे.

अवश्य वाचा : ‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ’ योजना नेमकी काय ? वाचा सविस्तर…

क्राऊडस्ट्राईकने यासंदर्भात निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली आहे. आम्ही या तक्रारींची माहिती घेत असून जोपर्यंत पुढील सुचना येत नाही, तोपर्यंत वाट यूजर्सनी वाट बघावी, असे त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. याबरोबरच यूजर्सनी स्वत:हून या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here