MIDC : कोंभळी एमआयडीसीला औद्योगिक विकास महामंडळाकडून अंतिम मंजुरी

MIDC : कोंभळी एमआयडीसीला औद्योगिक विकास महामंडळाकडून अंतिम मंजुरी

0
MIDC

MIDC : कर्जत : बहुचर्चित कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) एमआयडीसी (MIDC) मौजे कोंभळी- थेरगाव (ता.कर्जत) येथे होणार असून याबाबतचा आदेश गुरुवारी (ता.२९) संध्याकाळी निघाला आहे. औद्योगिक विकास महामंडळाने यास अंतिम मंजुरी दिली असल्याची माहिती माजीमंत्री आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी आपल्या सोशल मीडियावरून (Social Media) दिली आहे.     

अजित पवारांच्या सभेत मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी

राम शिंदे आणि रोहित पवार एमआयडीसीसाठी आग्रही

कर्जत-जामखेड मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार एमआयडीसीसाठी आग्रही होते. महाविकास आघाडी सरकार काळात आमदार रोहित पवार यांनी पाटेगाव-खंडाळा भागात एमआयडीसीस मंजुरी मिळवली. मात्र, ती स्थानिक शेतकरी आणि रहिवाशी यांच्या बागायती क्षेत्र व रहिवास भाग वगळवा तसेच केमिकल कारखाने नको म्हणून विरोध झाला. यासह मुंबई-पुणे येथील भूखंड माफियाची जमीन असल्याच्या कारणाने आमदार राम शिंदे यांनी निदर्शनास आणत त्यास स्थगिती मिळाली.

समन्यायी पाणी वाटपाचा संघर्ष टळला; जायकवाडीच्या जलसाठा ६७ टक्क्यांच्या पुढे

उद्योग विभागाने अंतिम मंजुरी केली प्रदान (MIDC)

तदनंतर सत्ता बदलानंतर आमदार राम शिंदेंनी आपले राजकीय वजन वापरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मदतीने कोंभळी-रवळगाव – थेरगाव परिसरात औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्व स्थळ पाहणी- सर्वेक्षण पार पाडत एमआयडीसीसाठी पाठपुरावा केला होता. त्यास गुरुवारी यश आले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या १६३ व्या उच्च अधिकार समितीच्या बैठकीत विषय क्रमांक तीन नुसार कोंभळी (ता.कर्जत) येथील एमआयडीसीला उद्योग विभागाने अंतिम मंजुरी प्रदान केली.

MIDC

एकूण २४६.०५ हे. आर क्षेत्रावर ही एमआयडीसी उभारली जाणार असून, भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरु होईल, याबाबत उद्योग विभागाने तसा अध्यादेश पारीत केला आहे. आवर्षण-प्रवण भागात एमआयडीसी होणार असल्याने या परिसराचे भाग्य उजळेल. परिसरात एमआयडीसीने विकासाची गंगा वाहील. तसेच आमदार राम शिंदेंनी या भागास दिलेला शब्द पुरा केला, अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली.