MIDC : कर्जत एमआयडीसीला शेतकऱ्यांचा विरोध; आंदोलनाचा इशारा

MIDC : कर्जत एमआयडीसीला शेतकऱ्यांचा विरोध; आंदोलनाचा इशारा

0
MIDC : कर्जत एमआयडीसीला शेतकऱ्यांचा विरोध; आंदोलनाचा इशारा
MIDC : कर्जत एमआयडीसीला शेतकऱ्यांचा विरोध; आंदोलनाचा इशारा

MIDC : कर्जत : तालुक्यातील कोंभळी- थेरगाव – रवळगाव एमआयडीसीला कोंभळी, खांडवी आणि परिसरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला आहे. आमच्या उताऱ्यावर चुकीच्या पद्धतीने नोंद लावत आम्हास भूमिहीन करण्याचा डाव असल्याचे म्हणत मंगळवारी (ता.१) शेतजमीन बचाव कृती समितीच्यावतीने चुकीच्या नोंदींचा आणि या बेकायदेशीर एमआयडीसी (MIDC) नकोच याचा निषेध केला. यावेळी लोकप्रतिनिधीसह कर्जत (Karjat) तालुका प्रशासनाच्या (Administration) विरोधात तीव्र प्रतिक्रिया देत रोष व्यक्त करण्यात आला.

नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नवी माहिती

शेतजमीनीच्या उताऱ्यावर विक्री करण्यास मनाईची नोंद लावल्याने निषेध

कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी एमआयडीसीकरीता तालुक्यातील कोंभळी-थेरगाव आणि रवळगाव परिसरातील जमिनीचे अधिग्रहण प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू झाली आहे. मंगळवारी (ता.१) खांडवी परिसरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी महिलांसह आंदोलन करीत शेतजमीनीच्या उताऱ्यावर विक्री करण्यास मनाई केल्याची नोंद लावल्याने निषेध व्यक्त केला. यावेळी रद्द करा, रद्द करा एमआयडीसी रद्द करा, आमच्या काळ्या आईचा सौदा रद्द करा, सुपीक जमिनीतून एमआयडीसी हद्द पार करा, यासह बेकायदेशीर एमआयडीसीला १०० टक्के विरोध अशा घोषणा देत राज्य सरकारसह तालुका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

अवश्य वाचा : “मराठी गया तेल लगाने”, असे म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चांगलीच घडवली अद्दल

एमआयडीसी रद्द न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा (MIDC)

काबाडकष्ट करून जमीन घेतली. वडिलोपार्जित जमीन कसताना हालअपेष्टा सहन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना ती जमीनच शासन आता आपल्या नावावर करीत असल्याने मरणाशिवाय पुढे पर्याय नाही, म्हणत एमआयडीसी रद्द न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. वास्तविक पाहता रीतसर गावामध्ये चावडी वाचन करून संबंधित शेतकऱ्यांच्या सहमतीने एमआयडीसी व्हावी. यात कोणत्याही ग्रामस्थांचे भले नाही. केवळ राजकीय श्रेय आणि चढाओढमध्ये बेकायदेशीर एमआयडीसी उभारण्याचा घाट असून परिसरातील शेतकरी देशोधडीला लावण्याचा आणि भूमिहीन करण्याचा सपाटा लावला असल्याचे म्हणत एमआयडीसी नकोच, असा नारा उपस्थितांनी दिला. यावेळी वैभव तापकीर, भरत वायसे, वैशाली तापकीर, योगिता गांगर्डे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. या पत्रकार परिषदेस एमआयडीसी विरोध कृती समितीचे विकास गांगर्डे, वैभव तापकीर, अक्षय गांगर्डे, गणेश खंडागळे, मिनीनाथ तापकीर, पप्पू तापकीर, वैशाली गांगर्डे, भारती गांगर्डे, मीरा तापकीर, नीता तापकीर, सविता तापकीर, राणी तापकीर, संगीता तापकीर, मनीषा तापकीर, नंदा वायसे आदींनी या भागात एमआयडीसी होऊ नये यासाठी प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.