MIDC : एमआयएडीसी परिसरात अवैध गुटखा बाळगणारे जेरबंद; दोघांविरोधात गुन्हा दाखल

MIDC : एमआयएडीसी परिसरात अवैध गुटखा बाळगणारे जेरबंद; दोघांविरोधात गुन्हा दाखल

0
MIDC : एमआयएडीसी परिसरात अवैध गुटखा बाळगणारे जेरबंद; दोघांविरोधात गुन्हा दाखल
MIDC : एमआयएडीसी परिसरात अवैध गुटखा बाळगणारे जेरबंद; दोघांविरोधात गुन्हा दाखल

MIDC : नगर : एमआयडीसी (MIDC) परिसरात अवैध गुटखा बाळगणाऱ्या किराणा दुकानावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने चार लाख व ५ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचे नावे

बापू मच्छिंद्र कोतकर (वय -४०, रा.गजानन कॉलनी, नवनागापुर, ता. जि.अहिल्यानगर), माऊली उर्फ ज्ञानेश्वर रमेश गायकवाड (वय ३६, रा. नगर मनमाड रोड, विळद घाट, ता. जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार निंबळक बायपास परिसरात एका किराणा दुकानात अवैध गुटखा विक्री करण्यासाठी साठवणूक करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार किराणा दुकानात छापा टाकला त्यावेळी शेडचीमध्ये सुमारे एका लाख ९३ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप झाले संतप्त; स्वच्छता निरीक्षकांची घेतली झाडाझडती

एकूण चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत (MIDC)

तर विळद घाट परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकला असता दोन लाख १२ हजार रुपये किमतीचा गोवा पानमसाला, विमल पान मसाला, सुगंधी तंबाखु असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत पोलीस विष्णू त्रिंबक भागवत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार विष्णू भागवत, अतुल लोटके, राहुल द्वारके, भिमराज खर्से, भगवान थोरात, अर्जुन बडे यांच्या पथकाने केली.