MIDC Police Station : सोन्याच्या दागिन्यासह दहा लाखांचा ऐवज लंपास; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

MIDC Police Station : सोन्याच्या दागिन्यासह दहा लाखांचा ऐवज लंपास; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

0
MIDC Police Station : सोन्याच्या दागिन्यासह दहा लाखांचा ऐवज लंपास; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
MIDC Police Station : सोन्याच्या दागिन्यासह दहा लाखांचा ऐवज लंपास; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

MIDC Police Station : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील बहिरवाडी येथील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून अज्ञात चोरट्याने (Thief) घरातील सोन्याचे दागिने (Gold Jewelry) रोख रक्कम असा सुमारे १० लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ ते २३ जुलै दरम्यान घडली.

नक्की वाचा : धुळ्यात राडा;माणिकराव कोकाटेंच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

चावी थोडी वाकडी झालेली आली निदर्शनास

नंदू बलभीम दारकुंडे (वय ४९, रा. बहिरवाडी, ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे औषधोउपचाराकरिता कोल्हापूर येथे १८ जुलै रोजी गेले होते. त्यांच्या घरी त्यांची आई व आजी या दोघी होत्या. फिर्यादी यांची आई व आजी घरातील काम उरकून घराला कुलूप लावून घराची चावी घराजवळच असलेल्या त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी ठेवून शेतात गेल्या. तिथून परत आल्यानंतर फिर्यादी यांच्या आईने दरवाजा उघडण्याकरिता चावी घेतली असता ती चावी थोडी वाकडी झालेली त्यांच्या निदर्शनास आली. त्यावर त्यांनी घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला असता घरातील सर्व साहित्य व्यवस्थित ठेवलेले दिसून आले.

अवश्य वाचा : कर्जत तालुका प्रशासनाने राशीन प्रकरणात सर्वसमावेशक तोडगा काढला

सोन्याची दागिण्याचे नसल्याचे आले दिसून (MIDC Police Station)

फिर्यादी हे कोल्हापूर येथून परत आल्यानंतर कपाटात पैसे ठेवण्याकरता गेले असता त्यांनी कपाट उघडून पाहिले असता आतील सर्व साहित्य व्यवस्थित ठेवलेले दिसून आले. परंतु त्यांनी ठेवलेले पैसे त्यांना दिसून आले नाही त्यावर त्यांनी घरात सगळ्याकडे चौकशी केली असता त्याबाबत कोणाला काही माहित नसल्याचे सर्वांनी सांगितले. फिर्यादी यांनी कपाटाची पाहणी केली असता त्यांना आतील सोन्याची दागिण्याचे नसल्याचे दिसून आले. घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चोरीची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.