MIDC Police Station : दोन तरूणांची गळफास घेऊन आत्महत्या; एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद

MIDC Police Station : दोन तरूणांची गळफास घेऊन आत्महत्या; एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद

0

MIDC Police Station : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे (MIDC Police Station) हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरूणांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केलेल्या घटना समोर आल्या आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूच्या (Accidental Death) नोंदी करण्यात आल्या आहेत.

अवश्य वाचा: शहरात नागरी सुविधांचा बोजवारा; शहर भाजपने आक्रमक होत आयुक्तांना घातला घेराव

डोंगरगण येथील घटना

पहिल्या घटनेत, यशवंत बाळासाहेब दाणी (वय ३८ रा. डोंगरगण, ता. अहिल्यानगर) यांनी बुधवारी (ता. १७) राहत्या गावी गळफास घेतला. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. खराडे यांनी तपासणीदरम्यान उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नक्की वाचा : आमदार रोहित पवारांच्या आमसभेत नागरिकांचा तक्रारींचा भडीमार

लामखेडे चौक येथील घटना (MIDC Police Station)

तर दुसऱ्या घटनेत, बबटी बोरीया (वय ३२, रा. रंगाबरी, पो. तलमा बहादुर, प. बंगाल, सध्या मुक्काम रत्नदीप हॉटेल, अहिल्यानगर) याने रत्नदीप हॉटेल, लामखेडे चौक येथे बुधवारी सकाळी गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. बोटे यांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणीही एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.