MIDC Police Station : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर (बायजाबाई) शिवारातील एका कत्तलखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police Station) छापा टाकून २०० किलो गोमांस व इतर साहित्य हस्तगत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघानाविरुद्ध गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : मानवावर हल्ला करणारे २३ बिबटे जेरबंद; मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार छापा
मुनीर खैरू शेख (रा. जेऊर बायजाबाई), मोहसीन मुश्ताक शेख (रा. भिंगार, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. जेऊर (बा) गावातील मुनीर खैरू शेख हा गोवंशीय जनावराचे मांस विक्री करीत आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, अंमलदार सुशांत दिवटे, आजिनाथ पालवे, ज्ञानेश्वर तांदळे, शुभम सुद्रुक, सुरज देशमुख यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला टाकून गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आला.
अवश्य वाचा : शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज द्या ; शेतकऱ्यांचे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन*
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (MIDC Police Station)
तेथे कत्तलीसाठी लागणारे साहित्य व अंदाजे २०० किलो गोमांस मिळून आले. पोलिसांनी मोहसीनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, जप्त केलेला मुद्देमाल हा मुनीर खैरू शेख याचा असल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



