MIDC Police Station : मोक्का गुन्ह्यातील पसार आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

MIDC Police Station : मोक्का गुन्ह्यातील पसार आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

0
MIDC Police Station : मोक्का गुन्ह्यातील पसार आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
MIDC Police Station : मोक्का गुन्ह्यातील पसार आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

MIDC Police Station : नगर : महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (Crime) अधिनियम (मोक्का) अंतर्गत गंभीर गुन्ह्यातील पसार आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police Station) शिताफीने ताब्यात घेतले आहे.

अवश्य वाचा: पोस्टल बॅलेटसाठी १०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट; यशवंत डांगे

काही काळापासून तो पसार

अजय सोमनाथ गुळवे (वय २६, रा. लामखडे पेट्रोल पंपाशेजारी, एमआयडीसी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल असून, गेल्या काही काळापासून तो पसार होता. दरम्यान, आरोपी नागापूर येथील रेणुकामाता मंदिर परिसरात येणार असल्याची एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली.

नक्की वाचा: रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू; तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद

सापळा रचून अत्यंत शिताफीने आरोपी ताब्यात (MIDC Police Station)

माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ तपास पथकातील अंमलदार राकेश खेडकर, राजू सुद्रिक, संदीप पवार, सचिन आडबल, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आघाव यांना कारवाईचे आदेश देत घटनास्थळी रवाना केले. तपास पथकाने परिसरात सापळा रचून अत्यंत शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले. दरम्यान, अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही एमआयडीसी, कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत.