MIDC Police Station : अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे छापासत्र; एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल

MIDC Police Station : अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे छापासत्र; एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल

0
MIDC Police Station : अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे छापासत्र; एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल
MIDC Police Station : अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे छापासत्र; एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल

MIDC Police Station : नगर : अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने सुरु असलेल्या अवैध धंद्यावर १४ ठिकाणी छापा (Raid) टाकून ८१ हजरांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत १९ संशयित आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: अहिल्यानगर–पुणे रेल्वे डबल लाईनचा डीपीआर पूर्ण: खासदार लंके

गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे

जालिंदर बहिरनाथ शिंदे (वय ४०, रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा), रामदास बाबू लोखंडे (वय ४८, रा. धानोरा ता. आष्टी, जि. बीड), शरद सीताराम पवार (वय ३५, रा. बोल्हेगाव, ता. जि. अहिल्यानगर), संदीप रामलाल पवार (वय ३५, रा. निंबळक, ता. जि. अहिल्यानगर), प्रदीप शिवाजी मंचेवर (वय ४०, रा. वैदुवाडी, ता. जि. अहिल्यानगर), राजेंद्र विलास पवार (वय २३, रा. खातगाव टाकळी), विनोद दिलीप पवार (वय २४, रा. खातगाव टाकळी), मनोज भाऊसाहेब नागरे (वय २६, रा. विळदघाटा, ता. जि. अहिल्यानगर), विशाल दीपक आदमाने (वय २३, रा. एम.आय.डी.सी),

संदीप रामलाल पवार (वय ३५, रा. निंबळक, अहिल्यानगर), संदीप दगडू दरंदले (वय ३७, रा. खारे करजुने, ता. जि. अहिल्यानगर), सचिन धोंडीभाऊ नरवडे (वय ३१, रा. खातगाव टाकळी), योगेश गोविंद आरडे (वय ३६, रा. नवनागापुर), संतोष अशोक खंडागळे (रा. निंबळक), गोविंद भाऊसाहेब हापसे (वय ३२, रा. निबळक बायपास), नवनाथ राजू पवार (वय ३१, रा. निंबळक), नाथा रभाजी चव्हाण (वय ५७, रा. पिंपळगांव उज्जैनी), विजय विनायक आल्हाट (रा. पिंपळगांव उज्जैनी), भाऊसाहेब बाबासाहेब दारकुंडे (रा. बहिरवाडी, ता. जि. अहिल्यानगर), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हे देखील वाचा : जानेवारीत ग्राहकांची UPI वरून रेकॉर्ड ब्रेक सोने खरेदी; नोंदवला गेला नवा विक्रम

यांच्या पथकाने केली कारवाई (MIDC Police Station)

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार ऱ्हदय घोडके, दीपक घाटकर, विष्णू भागवत, अतुल लोटके, शाहिद शेख, गणेश लोंढे, भिमराज खर्से, सागर ससाणे, आकाश काळे, अमोल आजबे, महादेव भांड, उमांकात गावडे यांच्या पथकाने केली.