MIDC Police Station : नगर : अहिल्यानगर MIDC (Ahilyanagar MIDC) मध्ये उद्योजकांना खंडणी (Extortion Demand) मागणारा संशयित आरोपीला MIDC पोलिसांनी (MIDC Police Station) ताब्यात घेतले आहे. महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जिवे ठार मारुन टाकु, असे म्हणुन खंडणी मागितली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघा विरुद्ध गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला होता. त्यापैकी अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नक्की वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
दर महिन्याला एक लाख रुपये देण्याची मागणी
निंबळक एम.आय.डी.सी प्लॉट नं. ७व ८ येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि. येथे अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी व्यक्तीने बेकायदेशीरपणे कंपनीमध्ये प्रवेश करुन, कंपनीचे मॅनेजर प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करुन काम बंद केले. व दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जिवे ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली होती. या बाबत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अवश्य वाचा : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर 5 टक्के मुस्लिम आरक्षणाचा शेवट
यापुर्वीही विविध गुन्हे दाखल (MIDC Police Station)
या घटनेचे गंभीर्य लक्षात घेता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच उनवणे याच्या विरोधात कोतवाली तोफखाना पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तापासात समोर आले आहे.



