Milk : दूध पावडर आयातीचा निर्णय तातडीने मागे घ्या : डॉ. नवले

Milk : दूध पावडर आयातीचा निर्णय तातडीने मागे घ्या : डॉ. नवले

0
Milk : दूध पावडर आयातीचा निर्णय तातडीने मागे घ्या : डॉ. नवले
Milk : दूध पावडर आयातीचा निर्णय तातडीने मागे घ्या : डॉ. नवले

Milk : अकोले : केंद्र सरकारने (Central Govt) दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळत 10 हजार टन दूध पावडर आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे. हा शेतकरी विरोधी निर्णय तातडीने मागे घ्यावा व देशभरात पडून असलेल्या दूध पावडरला निर्यात अनुदान देऊन दूध उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर दुधाला भाव (Milk Rate) कसा मिळेल याच्यासाठी पावले टाकावीत, अशी मागणी दूध उत्पादक (Milk producer) संघर्ष समितीच्यावतीने राज्य समन्वयक डॉ. अजित नवले (Ajit Navale) यांनी केली.

नक्की वाचा: लाच मागितल्याप्रकरणी महापालिका आयुक्तासह एक जणावर कारवाई

अतिरिक्त दूधची आवई उठवून भाव 35 वरून 25 पर्यंत खाली

महाराष्ट्रात आणि देशभरात साडेतीन लाख टन दुधाची पावडर गोदामांमध्ये पडून आहे. अतिरिक्त दूध उत्पादन झाल्याची आवई उठवून दुधाचे भाव 35 रुपयावरून पाडून 25 रुपयापर्यंत खाली आणण्यात आलेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही त्यातून भरून निघत नाही, यामुळे दूध उत्पादक महाराष्ट्रभर मेटाकुटीला आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये देशात आणि महाराष्ट्रात पडून असलेल्या पावडरला निर्यात अनुदान देऊन ही पावडर देशाबाहेर कशाप्रकारे पाठवता येईल, याचा विचार करण्याऐवजी केंद्र सरकार आणखी दुधाची पावडर आयात करणार असेल तर यापेक्षा दुसरे दुर्दैव भारतीय शेतकऱ्यांचे कोणतेही असू शकत नाही.

अवश्य वाचा: आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज, पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ६५ एकर जागा आरक्षित

निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी (Milk)

त्यामुळे केंद्र सरकारने त्यांचा हा शेतकरी विरोधी निर्णय तातडीने मागे घ्यावा व देशभरात पडून असलेल्या दूध पावडरला निर्यात अनुदान देऊन दूध उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर भाव दुधाला कसा मिळेल याच्यासाठी पावले टाकावीत, अशी मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here