Milk Rate Hike: कर्नाटकमध्ये दूध महागलं!वर्षभरात दुधाच्या दरात दुसऱ्यांदा वाढ

कर्नाटकमध्ये दुधाच्या दरात (Karnataka Milk Price) वाढ झाली आहे. कर्नाटक दूध महासंघाने नंदिनी दुधाच्या दरात (Nandini milk Price) लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे.

0
कर्नाटकमध्ये दूध महागलं!वर्षभरात दुधाच्या दरात दुसऱ्यांदा वाढ
कर्नाटकमध्ये दूध महागलं!वर्षभरात दुधाच्या दरात दुसऱ्यांदा वाढ

नगर : सध्या सगळीकडेच दुधाच्या दारात वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यातच कर्नाटकमध्ये दुधाच्या दरात (Karnataka Milk Price) वाढ झाली आहे. कर्नाटक दूध महासंघाने नंदिनी दुधाच्या दरात (Nandini milk Price) लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. दरात वाढ जरी केली असली तरी प्रत्येक पॅकेटमध्ये ५० मिली अतिरिक्त दुध मिळणार आहे. या वाढीनंतर १०५० मिलीसाठी दुधाची किंमत प्रति लिटर ४४ रुपये होईल. जे नंदिनी मिल्कच्या सर्व दुधाच्या प्रकारांमध्ये सर्वात स्वस्त आहे.

नक्की वाचा : सावधान!कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर विदर्भातही मुसळधार बरसणार 

वर्षभरात दुधाच्या दरात दुसऱ्यांदा वाढ (Milk Rate Hike)

उद्यापासून (ता.२६) नंदिनी दुधाच्या पॅकेटच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या सुधारित किमतीसह, कर्नाटक दूध महासंघाने प्रत्येक पॅकेटमध्ये ५०मिमी अतिरिक्त दूध देण्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे, एक लिटर दुधाच्या पाकिटात १०५० मिली दूध आणि अर्धा लिटर दुधाच्या पाकिटात ५५० मिली दूध मिळणार आहे. एक वर्षाच्या आत कर्नाटकातील दुधाची ही दुसरी दरवाढ आहे. गेल्या वर्षी जुलै २०२३ मध्ये कर्नाटक मिल्क फेडरेशनने दुधाच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली होती.

अवश्य वाचा : ओ स्त्री कल आना! श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’चा टिझर आऊट

नंदिनी दुधाच्या विक्रीतुन कोट्यावधी रुपयांची उलाढाल (Milk Rate Hike)

कर्नाटकमध्ये स्थानिक दूध आणि डेअरी ब्रँड नंदिनी हे खूप लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी नंदिनी मिल्क हा देखील निवडणुकीतील एक मुद्दा होता. याचे कारण नंदिनी आणि अमूल यांच्यातील संघर्ष होता. जेव्हापासून अमूलने कर्नाटकातील ई-कॉमर्स मार्केटद्वारे डेअरी उत्पादने ऑनलाइन विकण्याची घोषणा केली, तेव्हापासून स्थानिक हितसंबंधांवर परिणाम होत असल्याचे कारण देत राज्यात वाद सुरू झाला. नंदिनी दुधाच्या विक्रीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here